स्वच्छता दूतांचे आरोग्य धोक्यात
स्वच्छतादूतांचे आरोग्य धोक्यात
पालघर नगर परिषदेकडून सोयीसुविधांचा अभाव
जव्हार, ता. ५ (बातमीदार) ः शहरातील २० हजार नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या ४९ स्वच्छता कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे; पण नगर परिषदेकडून आवश्यक सोयीसुविधा दिल्या जात नसल्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत काम करावे लागत आहे.
जव्हार नगर परिषदेत ४९ स्वच्छता कामगार कार्यरत आहेत. त्यापैकी नऊ कामगार कायमसेवेत आहेत, तर पाच कंत्राटी कामगार नगर परिषदेच्या विविध आस्थापनांवर काम करत आहेत. तर उर्वरित ३५ कंत्राटी स्वच्छता कामगार दररोज पहाटेपासून सायंकाळपर्यंत मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, तुंबलेल्या नाल्यांची स्वच्छता करून शहर स्वच्छ ठेवण्याची कामे करत आहेत; पण या स्वच्छता कामगारांना हातमोजे, शूज, मास्क, सॅनिटायझर, डेटॉल तसेच इतर आवश्यक सुरक्षा साहित्य पुरवले जात नसल्यामुळे त्वचा तसेच श्वसनाच्या विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

