युरोप दौऱ्यावर विक्रमगडचा शेतकरी
युरोप दौऱ्यावर विक्रमगडचा शेतकरी
प्रगत तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी शासनाकडून निवड
विक्रमगड, ता. ५ (बातमीदार) ः महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत प्रगत शेती तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी युरोप अभ्यास दौरा काढण्यात आला आहे. या दौऱ्यावर विक्रमगड तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी वैजनाथ पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून राज्यातील नावीन्यपूर्ण शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना परदेशातील आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अनुभव मिळावा, तसेच त्या माध्यमातून राज्यातील शेती अधिक प्रगत व उत्पादनक्षम व्हावी, या उद्देशाने हा अभ्यास दौरा होणार आहे. या दौऱ्यात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना युरोपमधील विविध देशांतील आधुनिक शेती पद्धती, अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान, शेती व्यवस्थापन, फळबाग लागवड, सेंद्रिय शेती, शेतीमाल प्रक्रिया उद्योग तसेच कृषी उत्पादनांचे विपणन व्यवस्थापनाचा सखोल अभ्यास करण्याची संधी मिळत आहे. या अभ्यास दौऱ्यामध्ये विक्रमगड तालुक्यातील वैजनाथ पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
------------------------------
उत्पन्नवाढीसाठी मार्गदर्शन
युरोपमधील विविध कृषी संशोधन केंद्रे, आधुनिक शेततळी, हरितगृह शेती (ग्रीन हाउस), ड्रिप सिंचन प्रणाली, फळबाग व्यवस्थापन, दुग्धव्यवसाय, कृषी प्रक्रिया उद्योग तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या कार्यपद्धतींचा अभ्यास शेतकऱ्यांकडून केला जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन कसे घ्यावे, तसेच शेतीमालाला मूल्यवर्धन करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचे मार्गदर्शन केले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

