मार्शल आर्ट्स स्पर्धेत महाराष्ट्र अव्वल
मार्शल आर्ट्स स्पर्धेत महाराष्ट्र अव्वल
मुंबई उपनगरातील खेळाडूंची उल्लेखनीय कामगिरी
मुंबई, ता. ५ : छत्रपती संभाजीनगर येथील रामचंद्र हॉलमध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शास्त्रंग मार्शल आर्ट्स स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने उत्कृष्ट कामगिरी करत, प्रथम क्रमांक पटकावून विजेतेपद मिळवले.
या स्पर्धेचे नियोजन राज्य संघटनेचे सचिव मिलिंद काटमोरे तसेच राष्ट्रीय संघटनेचे सचिव ग्रँडमास्टर विक्रम थापा यांनी केले होते. स्पर्धेत हरियाना, पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेश, चंडीगड आणि महाराष्ट्र या राज्यांमधील तीनशेहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत मुंबई उपनगरातील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदके पटकावत महाराष्ट्राला प्रथम क्रमांक मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. विजेत्या खेळाडूंमध्ये मंगेश शिर्के, पशुपती ठाकूर, गौरांग ठाकूर, नव्या करंजेकर, अपूर्वा मोहिते, आराध्य कानडे, आलिया अगलावे, अथर्व अनावकर, रीतवी टेलर, क्रीषेल पिंटो, सानिका चव्हाण, आराध्या वालावलकर, निकोलस मकवास, मैत्री महाडीक, वंशिका कदम, रुद्र बनसोडे, श्रेयश गिरमे, हर्षाली राठोड, नियांशु पेठे, भव्या मोहिते, स्वरा ननावरे, नैतिक बगालिया, मिनाक्षी राऊत, सार्थक धुळे, सार्थक भरडावा, अथर्व भुवड आणि तन्मय मालुष्टे यांचा समावेश आहे.
या खेळाडूंना मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष पशुपती ठाकूर, सचिव मंगेश शिर्के तसेच प्रशिक्षक गौरांग ठाकूर, अखिलेश राणे, हर्ष राणे आणि अपूर्वा मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले आहे. स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करत राज्याला राष्ट्रीय पातळीवर मानाचा मुकुट मिळवून दिल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

