उन्हाच्या वाढत्या पाऱ्यामुळे लिंबू महाग

उन्हाच्या वाढत्या पाऱ्यामुळे लिंबू महाग

Published on

वाशी, ता. ५ (बातमीदार) : वाढत्या तापमानामुळे नवी मुंबई शहरात लिंबाच्या मागणीत मोठी वाढ झाली असून त्याचा परिणाम थेट भावावर झाला आहे. गेल्या आठवड्यापर्यंत स्वस्त मिळणारे लिंबू आता बाजारात महाग झाले असून किरकोळ बाजारात एका लिंबासाठी पाच ते सहा रुपये मोजावे लागत आहेत.

उन्हाचा पारा वाढत असताना नागरिकांकडून लिंबूपाणी, सरबत व इतर पेयांचे सेवन वाढले आहे. त्यामुळे लिंबाच्या मागणीत वाढ झाली असून बाजारात त्याचे भाव झपाट्याने वाढले आहेत. आठवडाभरापूर्वी घाऊक बाजारात दीड ते दोन रुपयांना मिळणारे लिंबू आता दोन ते तीन रुपये झाले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. ५) २६६ क्विंटल लिंबांची आवक झाली. महाराष्ट्रातील हंगाम संपत आल्याने सध्या लिंबाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात दक्षिणेकडील राज्यांतून, विशेषतः तमिळनाडू व इतर राज्यांतून होत आहे. त्यामुळे आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने भाव वाढले असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

किरकोळ बाजारात आठवडाभरापूर्वी १० रुपयांत चार लिंबू मिळत होते; मात्र आता त्याच किमतीत दोन लिंबू मिळत असून काही ठिकाणी एका लिंबासाठी पाच रुपये मोजावे लागत आहेत. उन्हाळ्याचा कालावधी वाढत गेल्यास लिंबाच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. उन्हामुळे लिंबूपाणी व थंड पेयांची मागणी वाढत असल्याने येत्या काही दिवसांत लिंबाचे भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com