रक्तविकार असलेल्या महिलेवर रोबोटिक शस्त्रक्रिया
नवी मुंबई, ता. ५ (वार्ताहर) : ज्या आजारात साध्या जखमेनेही जीव जाण्याची भीती असते, अशा ग्लांझमन्स थ्रोम्बास्थेनिया या दुर्मिळ आणि जीवघेण्या रक्तविकाराने ग्रस्त असलेल्या ३७ वर्षीय महिलेवर डॉक्टरांनी आधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शून्य रक्तस्त्रावासह हिस्टेरेक्टॉमी शस्रक्रिया करून तिला नवजीवन दिले आहे. नवी मुंबईतील वैद्यकीय क्षेत्रात ही एक ऐतिहासिक कामगिरी मानली जात आहे.
नवी मुंबईतील ३७ वर्षीय नीलम या एका जन्मजात आणि दुर्मिळ आजाराने त्रस्त होत्या. या आजारात रक्तातील फ्लेटलेट्सची संख्या सामान्य दिसते. मात्र, त्या आपले कार्य करू शकत नाहीत. परिणामी, रक्ताची गुठळी तयार होत नाही आणि अनियंत्रित रक्तस्त्राव होतो. रुग्णासाठी प्रत्येक महिन्याची मासिक पाळी म्हणजे एक मेडिकल इमर्जन्सी होती. दरमहा होणारा अतिरक्तस्त्राव रोखण्यासाठी त्यांना वारंवार रक्त चढवावे लागत होते. महिन्याभरापूर्वी नीलम यांचे हिमोग्लोबिन ४जी /डीएल इतके झाले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या त्रासातून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी त्यांनी गर्भाशय काढण्याचा धाडसी निर्णय घेतला. हा धोका ओळखून डॉ. तृप्ती दुबे आणि डॉ. पुनीत जैन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शून्य रक्तस्रावासह हिस्टेरेक्टॉमी शस्रक्रिया केली.
शस्त्रक्रियेनंतर अवघ्या काही दिवसांत नीलम यांनी रुग्णालयातूनच आपल्या ऑफिसचे काम सुरू केले. अशा रुग्णांवर शस्त्रक्रिया करताना प्रत्येक पाऊल मोजून-मापून टाकावे लागते. सूक्ष्म नियोजनामुळे आम्ही रक्ताचा अपव्यय टाळू शकलो. रोबोटिक शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीच्या परिस्थितीतही वरदान ठरू शकते, हे यावरून सिद्ध झाल्याचे डॉ. दुबे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

