तरुणाचे अपहरण जीवे मारण्याची धमकी ; तिघांना अटक,दोघे फरार
तरुणाच्या अपहरणप्रकरणी तिघांना अटक
भिवंडी, ता. ५ (वार्ताहर): शांतीनगर परिसरातील हैदर सय्यद (२३) या तरुणाचे अपहरण करून ५० हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ३ मार्चच्या रात्री हैदरला जबरदस्तीने उचलून डोंगरीपाडा येथील एका गोदामात डांबून ठेवण्यात आले होते. आरोपी सादिक अन्सारी, मोहम्मद खान आणि तौफिक शेख यांनी हैदरला बेदम मारहाण करत त्याच्या कुटुंबाकडे पैशांची मागणी केली; तसेच पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. हैदरच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर शांतीनगर पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवून गोदामावर छापा टाकला आणि हैदरची सुटका केली. या प्रकरणात जाहिद अलीसह अन्य एक साथीदार फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

