उल्हासनगरातील भगवान हॉस्पिटलचे सोनोग्राफी सेंटर महापालिकेकडून सील :

उल्हासनगरातील भगवान हॉस्पिटलचे सोनोग्राफी सेंटर महापालिकेकडून सील :

Published on

पीसीपीएनडीटीच्या उल्लंघनाविरोधात
सोनोग्राफी सेंटरवर कारवाई

उल्हासनगर, ता. ५ (वार्ताहर) : उल्हासनगर महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने पीसीपीएनडीटी कायद्याच्या उल्लंघनाविरोधात कठोर पावले उचलत शहरातील एका सोनोग्राफी सेंटरवर मोठी कारवाई करण्यात आली. उल्हासनगर-५ येथील भगवान हॉस्पिटलमधील सोनोग्राफी सेंटरमध्ये नियमांचे गंभीर उल्लंघन आणि अपात्र व्यक्तीकडून यंत्रणा हाताळली जात असल्याचे उघड झाल्यानंतर महापालिकेच्या पथकाने गुरुवारी (ता. ५) छापा टाकत सेंटर सील केले.
उल्हासनगर महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा समुचित प्राधिकारी डॉ. मोहिनी धर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या वैद्यकीय पथकाने या सेंटरला आकस्मिक भेट दिली. तपासणीदरम्यान पीसीपीएनडीटी कायद्याच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, हे सोनोग्राफी सेंटर पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत नोंदणीकृत असले तरी सोनोग्राफी मशीनचा गैरवापर होत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. तसेच तपासणीदरम्यान एक अपात्र आणि अप्रशिक्षित व्यक्ती सोनोग्राफी मशीन हाताळताना आढळून आली. वैद्यकीय नियमांनुसार ही बाब अत्यंत गंभीर मानली जाते. या सर्व बाबींचा विचार करून पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत संबंधित सोनोग्राफी सेंटरची नोंदणी तत्काळ रद्द करण्यात आली असून, केंद्र सील करण्यात आले.

पीसीपीएनडीटी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे शहरातील सर्व सोनोग्राफी केंद्रांची नियमित तपासणी केली जाणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनीही अशा प्रकारच्या संशयास्पद बाबींसंदर्भात प्रशासनाला माहिती देऊन सहकार्य करावे.
- डॉ. मोहिनी धर्मा, वैद्यकीय आरोग्य अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com