उस्ताद झाकीर हुसेन यांच्या जयंतीनिमित्त संगीत कार्यक्रमाचे आयोजन
उस्ताद झाकीर हुसेन यांच्या जयंतीनिमित्त संगीत कार्यक्रमाचे आयोजन
हार्टबीट्स - द म्युझिक विदिनचे होणार पुनरुज्जीवन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : जगप्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त ‘हार्टबीट्स - द म्युझिक विदिन’ या प्रतिष्ठित संगीत अनुभवाचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. ग्रेस फाउंडेशन अर्थात गुणीजान रिसर्च, आर्ट, कल्चर अँड एज्युकेशनतर्फे आयोजित हा कार्यक्रम सोमवारी (ता. ९) सायंकाळी ६.३० वाजता रवींद्र नाट्यमंदिर येथे रंगणार असून, रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे.
शशी व्यास यांनी २००८ मध्ये ‘हार्टबीट्स – द म्युझिक विदिन’ या अद्वितीय संगीत संकल्पनेची निर्मिती केली होती. ही संकल्पना ऐकल्यानंतर उस्ताद झाकीर हुसेन यांनी तिचे कलात्मक सामर्थ्य ओळखत या उपक्रमात सहर्ष सहभाग नोंदवला होता. त्यांच्या सहभागामुळे या कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली होती. २००८ मध्ये सादर झालेल्या या कार्यक्रमात शंकर महादेवन, व्ही. सेल्वागणेश, यू. श्रीनिवास आणि शिवामणी यासारख्या दिग्गज कलाकारांनी एकत्र येत मुंबई, दिल्ली, बेंगळुरू आणि कोलकाता येथे मैफली सादर केल्या होत्या. प्रत्येक शहरात या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता.
---------------
१८ वर्षांनंतर पुनरागमन
आता तब्बल १८ वर्षांनंतर ‘हार्टबीट्स’ नव्या दृष्टिकोनासह पुन्हा रंगमंचावर येत आहे. उस्ताद झाकीर हुसेन यांच्या ७५व्या जयंतीचे औचित्य साधत या मैफलीत भारताच्या संगीत परंपरेचे वारसदार असलेल्या युवा कलाकारांचा सहभाग असणार आहे. यात एस. आकाश (बासरी), मेहताब अली नियाझी (सितार), सिद्धार्थ बेलमन्नू (गायन), शिखरनाद कुरेशी (ड्रम्स), स्वामीनाथन सेल्वगणेश (कंजिरा), इशान घोष (तबला) तसेच कीबोर्डवर कौशिकी जोगळेकर यांचा समावेश आहे. ग्रेस फाउडेशन अर्थातच गुणीजान रिसर्च, आर्ट, कल्चर अँड एज्युकेशनतर्फे उस्ताद झाकीर हुसेन यांच्या ७५व्या जयंतीनिमित्त ‘हार्टबीट्स – द म्युझिक विदिन’ या प्रतिष्ठित संगीत अनुभवाचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. सोमवारी रवींद्र नाट्यमंदिर येथे सायंकाळी ६.३० वाजता या संगीतयम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य आहे.
----------
हार्टबीट्सचे पुनरुज्जीवन हे त्या शाश्वत संवादाला जिवंत ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे, ज्या गुरुंनी संगीताला दैवाचे प्रवेशद्वार बनवले, त्यांना वंदन करण्याचाही हा प्रयत्न आहे.
शशी व्यास, संस्थापक व संचालक, पंचम निषाद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

