कर्जतचा पारा ४१ अंशांवर
कर्जतचा पारा ४१ अंशांवर
तापमानात आणखी वाढणार!
बदलापूर, ता. ५ (बातमीदार) ः मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच ठाणे जिल्ह्यासह कोकणात उन्हाचा तीव्र तडाखा जाणवू लागला असून, आज डोंबिवलीजवळील पलावा सिटी आणि कर्जत परिसरात सर्वाधिक ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बदलापूर शहराचे तापमान ३९.९ अंशांपर्यंत पोहोचले होते.
मार्चच्या पहिल्याच आठवड्यात तापमान ४० अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचल्याने नागरिकांना कडक उन्हाळ्याची जाणीव होऊ लागली आहे. दुपारच्या वेळेत शहरातील रस्ते तुलनेने ओस पडताना दिसत असून, उष्णतेमुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील विविध भागांमध्येही तापमानात लक्षणीय वाढ नोंदवली जात आहे. हवामानतज्ज्ञांच्या मते शहरांमध्ये वाढलेले सिमेंटचे जंगल, वेगाने होणारे शहरीकरण आणि नैसर्गिक जंगलांचे कमी होत चाललेले प्रमाण यामुळे उष्णतेची तीव्रता अधिक जाणवू लागली आहे. येत्या काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात असून, नागरिकांनी उष्णतेपासून स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
...
तापमान (अंश सेल्सिअस)
बदलापूर - ३९.९
वाशी - ३८.६
मुंबई - ३८.९
ठाणे - ३९
ऐरोली - ३९.२
नेरूळ - ३९.३
कळवा - ३९.४
विरार - ३९.५
पालघर - ३९.६
पनवेल - ३९.८
कल्याण, डोंबिवली - ४०
खारघर - ४०.२
मुंब्रा - ४०.३
पलावा आणि कर्जत - ४१
...
अँटीसायक्लोनच्या प्रभावामुळे ईशान्येकडून कोरडे वारे वाहत आहेत. हे वारे जमिनीवरून वाहत असल्यामुळे कमाल तापमानात वाढ होत आहे. त्यातच समुद्री वारा उशिरा सुरू होत असल्याने उष्णतेची तीव्रता वाढून उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण होत आहे. अंतर्गत कोकणात १० मार्चपर्यंत तापमान ४० ते ४२ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. नागरिकांनी दुपारी १२ ते ४ दरम्यान उन्हात जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे, हलके सुती कपडे वापरावेत.
- अभिजित मोडक, हवामान अभ्यासक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

