पीएनबी घोटाळा प्रकरण :

पीएनबी घोटाळा प्रकरण :

Published on

पीएनबी घोटाळा प्रकरण :
नीरव मोदीच्या दोन्ही भावांना विशेष न्यायालयाची नोटीस
फरारी आर्थिक गुन्हेगार का घोषित करू नये, याबाबत मागितले स्पष्टीकरण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्याप्रकरणी फरारी हिरे व्यापारी नीरव मोदीचे दोन भाऊ नीशल आणि नेहल मोदी यांना अधिकृतपणे फरारी आर्थिक गुन्हेगार (एफईओ) का घोषित करू नये, अशी विचारणा विशेष न्यायालयाने केली. तसेच नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

या दोघांनाही फरारी आर्थिक गुन्हेगार कायद्याअंतर्गत फरारी घोषित करण्याच्या मागणीसाठी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अर्ज केला आहे. त्याची दखल घेऊन आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) स्थापन विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. व्ही. गुजराथी यांनी नीशल आणि नेहल या दोघांना नोटीस बजावली. मोदी याच्या कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, आदित्य नानावटी आणि संदीप मिस्त्री यांनाही विशेष न्यायालयाने नोटीस बजावली असून त्यांनाही भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

एखाद्या व्यक्तीला फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित केल्यावर त्याची मालमत्ता जप्त होऊ शकते. नेहलने नीरव मोदीला बनावट कंपन्या आणि परदेशातील व्यवहारांद्वारे मोठ्या प्रमाणात पैसे वर्ग करण्यास आणि त्यासंबंधित माहिती लपवण्यास मदत केली. तर नीशल हा बनावट भागीदारांच्या नियुक्तीमध्ये सहभागी होता आणि २०११ ते २०१३ दरम्यान दुबईतील काही बनावट कंपन्यांमध्ये तो लाभार्थी होता, असा ईडीचा आरोप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com