गाडी हळू चालव म्हणताच संतापाचा स्फोट; टिटवाळ्यात घरावर हल्ला, तिघे जखमी
गाडी हळू चालव म्हणताच संतापाचा स्फोट
टिटवाळ्यात घरावर हल्ला, तिघे जखमी
टिटवाळा, ता. ५ (वार्ताहर) : टिटवाळा परिसरात किरकोळ कारणावरून उसळलेल्या संतापाने हिंसक वळण घेतल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. ५) समोर आली आहे. ‘गाडी हळू चालवा’ अशी साधी सूचना दिल्याच्या रागातून पाच ते सहा जणांच्या टोळीने एका कुटुंबावर धाड टाकत घरात घुसून तोडफोड केली आणि कुटुंबीयांना बेदम मारहाण केल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी कल्याण ग्रामीण टिटवाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
टिटवाळा येथील आंबेडकर चौक परिसरातील आर. के. चाळ, राजेश्वरी बिल्डिंगजवळ ही घटना घडली. तक्रारदार झुल्फेकर अली अब्दुल्ला खान (५०) हे आपल्या भावांसह घराबाहेर उभे असताना दुचाकीवरून एक तरुण वेगाने त्या परिसरातून जात होता. अरुंद रस्त्यामुळे आणि नागरिकांची वर्दळ असल्याने खान यांनी संबंधित तरुणाला गाडी सावकाश चालवण्याचा सल्ला दिला. मात्र, या साध्या सूचनेवरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि वातावरण तापले. वादानंतर काही वेळाने संबंधित तरुण पुन्हा घटनास्थळी परतला; त्याने आपल्या वडिलांसह आणखी काही साथीदारांना सोबत आणले. या टोळीने घटनास्थळी येताच शिवीगाळ करत संतापाचा उद्रेक केला आणि घरावर धाड टाकली. लोखंडी वस्तूंच्या सहाय्याने घरातील साहित्याची तोडफोड करण्यात आली. दरम्यान, तक्रारदार झुल्फेकर खान यांच्यावरही हल्ला करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

