टाटा स्मारक केंद्राचा आंतरराष्ट्रीय अभ्यास,

टाटा स्मारक केंद्राचा आंतरराष्ट्रीय अभ्यास,

Published on

आधुनिक कर्करोग औषधांची किंमत सामान्यांच्या आवाक्याबाहेर
टाटा स्मारक केंद्राचा आंतरराष्ट्रीय अभ्यास
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : डोके व मानेच्या कर्करोगावरील आधुनिक उपचारपद्धती प्रभावी असल्या, तरी त्यांची किंमत भारतासह जगभरातील रुग्णांच्या आवाक्याबाहेर असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. टाटा मेमोरियल सेंटर आणि ॲक्ट्रेक केंद्रातील संशोधकांनी केलेल्या आंतरराष्ट्रीय अभ्यासात ही बाब स्पष्ट झाली आहे.

हा अभ्यास नामांकित जर्नल हेड आणि नेकमध्ये २०२६ मध्ये प्रकाशित झाला आहे. दरम्यान, हा अभ्यास डिसपॅरिटी इन द मार्केट्स ऑफ अफोर्डइबिलिटी अक्रोस टार्गेटेड अँड इम्यून थेरपी ड्रग्स युज्ड इन हेड अँड नेक कँसर या शीर्षकाच्या संशोधनात भारत, अमेरिका, युनायटेड किंगडमसह सात देशांतील औषधांच्या किमतींची तुलना करण्यात आली. विशेषतः टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपीसारख्या नव्या पिढीतील औषधांचा खर्च आणि त्या तुलनेत नागरिकांचे सरासरी उत्पन्न, आरोग्य विमा कवच आणि सरकारी सहाय्य या निकषांचा सखोल अभ्यास करण्यात आला.

काय आढळले?
अभ्यासानुसार, इम्युनोथेरपी औषधे अत्यंत महागडी असून, अनेक देशांत ती रुग्णांना उपलब्ध असली तरी प्रत्यक्षात परवडणारी नाहीत. विकसित देशांमध्ये विमा व्यवस्था तुलनेने सक्षम असली, तरी औषधांच्या उच्च किमतीमुळे कुटुंबांवर मोठा आर्थिक ताण येतो. भारतात तर बहुतांश रुग्णांना स्वतःच्या खिशातून खर्च करावा लागत असल्याने उपचार अर्धवट सोडण्याची वेळ येऊ शकते, असे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

आरोग्य धोरणासाठी इशारा
संशोधकांच्या मते, कर्करोग उपचारांमध्ये नव्या औषधांनी आशेचा किरण निर्माण केला असला, तरी ‘उपलब्धता’ आणि ‘परवडण्याची क्षमता’ यांतील दरी वाढत आहे. त्यामुळे औषधांच्या किंमत नियंत्रण, सार्वत्रिक आरोग्य विमा आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणाबाबत तातडीने धोरणात्मक पावले उचलण्याची गरज अधोरेखित झाली आहे. डॉ. अर्जुन सिंह यांच्या मते “उपचार आहेत, पण ते किती जणांना प्रत्यक्षात मिळतात? हा मूलभूत प्रश्न या अभ्यासातून पुढे आला आहे. कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारात आधुनिक औषधांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जागतिक स्तरावर समन्वित प्रयत्नांची आवश्यकता असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com