१० मार्चला पुन्हा गिरणी कामगार विधान भवनावर धडकणार - मुंबईतील सभेतून ठाम इशारा
गिरणी कामगार विधान भवनावर धडकणार
१० मार्चला मोर्चा; सरकारकडून आश्वासनांची पुर्तता नाही
मुंबई, ता. ६ ः गिरणी कामगारांच्या घराचा व पुनवर्सनाचा प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास १० मार्चला लाखो गिरणी कामगार विधान भवनावर धडक मोर्चा काढतील. तसेच सरकारला धारेवर धरतील. आश्वासनांची पुनरावृत्ती आता सहन केली जाणार नाही, असा निर्धार गिरणी कामगारांनी व्यक्त केला आहे.
मुंबई येथील मधु दंडवते सभागृहात संयुक्त मराठी मुंबई चळवळीतर्फे गिरणी कामगार व वारसाची सभा झाली. या सभेतून राज्य सरकारला कडक शब्दात इशारा देण्यात आला. गिरणी कामगारांना मुंबईत घरे देण्यासाठी कालबद्ध व नियोजित आराखडा जाहीर करावा. त्या माध्यमातून गिरणी कामगारांना मुंबईतील घराची हमी देणारी इरादा पत्रे तत्काळ वितरित करावीत. तसेच वंचित गिरणी कामगारांना पुन्हा नव्याने अर्ज करण्याची एक संधी देण्यात यावी. तसेच १९८१ च्या संपातील गिरणी कामगारांनाही सदनिकेच्या प्रकल्पात सामावून घेण्यात यावे आदी मागण्या या सभेत करण्यात आल्या.
महाराष्ट्र शासन, म्हाडा व इतर संस्थांचे मुंबईतील सध्या सुरू असलेले ५६ पुनवर्सन प्रकल्प, तसेच धारावी व बीडीडी सारख्या मोठ्या प्रकल्पांध्येही गिरणी कामगारांचे पुनर्वसन करणे शक्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले. रमाबाई नगर प्रकल्पात सुमारे १८ हजार घरे नियोजित असूनही गिरणी कामगारांसाठी स्वतंत्र आराखडा जाहीर झाला नाही. याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
संयुक्त मराठीचे युवा नेतृत्व रमाकांत बने यांनी सांगितले, की पुनर्वसनासाठी पर्याय उपलब्ध असताना अंमलबजावणी टाळणे अन्यायकारक आहे. सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास १० मार्चला लाखो गिरणी कामगाराचा मोर्चा निर्णायक ठरेल. या सभेला ॲड. अरुण निंवाळकर, ॲड. बबन मोरे, ॲड. सुनील साळुंखे, सघटनेचे अध्यक्ष विवेकानंद बेळुसे, रमाकांत बने यानी मार्गदर्शन केले. तसेच श्याम कवाडी, रवींद्र ताम्हणकर, शिवराम जाधव, रवींद्र गवळी, प्रवीण कदम, हरिश्चंद्र करगळ, प्रज्ञा कदम, मधुकर साठे, सिध्दनाथ चव्हाण, अर्जुन जाधव आणि मोठ्या संख्येने गिरणी कामगार व त्यांचे वारसदार उपस्थित होते. सभा संघर्षाच्या निर्धाराने संपन्न झाली. गिरणी कामगारांना मुंबईत घरे मिळेपर्यंत लढा तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

