उल्हासनगरमधील रेस्टॉरंटमध्ये तरुणाचा धुमाकूळ
उल्हासनगरमधील रेस्टॉरंटमध्ये तरुणाचा धुमाकूळ
उल्हासनगर, ता. ६ (वार्ताहर) : उल्हासनगर पोलिस ठाण्याच्या समोरच असलेल्या जय कमल रेस्टॉरंट अँड बारमध्ये एका तरुणाने किरकोळ कारणावरून संताप व्यक्त करत थेट हॉटेल मालकावर काचेची बाटली फेकून हल्ला केला. त्यानंतर बाहेर येत दगडफेक करत तोडफोडही केल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही घटना मंगळवारी (ता. ३) घडली असून, ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धूलिवंदनाच्या रात्री संबंधित आरोपी जय कमल रेस्टॉरंट अँड बारमध्ये आला आणि सिगारेटची मागणी करू लागला; मात्र रेस्टॉरंटमध्ये सिगारेट उपलब्ध नसल्याचे हॉटेल मालकाने सांगितल्यावर तो अचानक संतापला. रागाच्या भरात त्याने काउंटरवर ठेवलेली काचेची बाटली उचलून थेट हॉटेल मालकाच्या दिशेने फेकली, ही बाटली मालकाच्या चेहऱ्यावर आदळल्याने ते जखमी झाले. घटना घडताच रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून आरोपी युवकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने रेस्टॉरंटसमोर पडलेले दगड उचलून बाहेरील काउंटर व इतर साहित्यावर मारत तोडफोड केली. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे परिसरात काही काळ अफरातफरीचे वातावरण निर्माण झाले. धक्कादायक बाब म्हणजे ही संपूर्ण घटना उल्हासनगर पोलिस ठाण्याच्या अगदी समोर घडली. या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

