शिपायाची चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या

शिपायाची चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या

Published on

शिपायाची चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ६ : दत्तनगर परिसरातील प्रगती महाविद्यालयामधील ग्रंथालयातील एका शिपायाने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता. ५) दुपारी घडली आहे. प्रवीण चौधरी (वय ४२) असे मृत शिपायाचे नाव असून याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रामनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण हे ठाकुर्ली येथील खंबाळपाडा परिसरात राहण्यास होते. ते गेल्या काही वर्षांपासून डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगर येथील प्रगती महाविद्यालयामध्ये शिपाई म्हणून कार्यरत होते. गुरुवारी दुपारी सुमारे ३.१५च्या सुमारास प्रवीण हे आपल्या आई-वडिलांसह कॉलेजमध्ये प्राचार्यांशी चर्चा करण्यासाठी आले होते. प्राचार्यांच्या कार्यालयात चर्चा सुरू असतानाच त्यांनी अचानक चौथ्या मजल्यावरील बाल्कनीकडे धाव घेतली आणि क्षणात खाली उडी घेतली. ही घटना इतक्या अचानक घडल्याने उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला. घटनेनंतर तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. प्राथमिक तपासात प्रवीण यांचा स्वभाव तापट असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांच्या कामकाज आणि वर्तनाबाबत महाविद्यालय प्रशासनाकडून यापूर्वी त्यांना अनेकदा समज देण्यात आली होती. गुरुवारीदेखील महाविद्यालय प्रशासनाने समज देण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना बोलाविले होते. चर्चेदरम्यान अचानक रागाच्या भरात त्यांनी चौथ्या मजल्यावरून उडी घेतली. याप्रकरणी रामनगर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com