तारापूर एमआयडीसीतील कंपनीतून कच्च्या मालाची चोरी
तारापूर एमआयडीसीतील कंपनीतून कच्च्या मालाची चोरी
बोईसर, ता. ६ (वार्ताहर) : तारापूर एमआयडीसी परिसरातील विराज प्रोफाईल प्रा. लि. या कंपनीच्या प्लांटमधून कच्च्या मालाची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बोईसर पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. ४) रात्री ११.३० ते गुरुवारी (ता. ५) पहाटे ३च्या दरम्यान कंपनीच्या एसएमएस-१ प्लांटमधील एओडी इंडक्शन एरिया परिसरातून आरोपींनी ३.५ किलो वजनाचा फेरो बोरोन (८२२ रुपये) आणि ६४ किलो वजनाचा फेरो क्रोम (७,५५२ रुपये) असा एकूण ८,३७४ रुपयांचा माल चोरी करून नेला. याप्रकरणी लक्ष्मण रामाधीन यादव (वय ४४) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अविनाश तांडेल व रवी हजारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

