सायन-पनवेल महामार्गावर दुचाकीचालकाचा मृत्यू

सायन-पनवेल महामार्गावर दुचाकीचालकाचा मृत्यू

Published on

सायन-पनवेल महामार्गावर दुचाकीचालकाचा मृत्यू

नवी मुंबई, ता. ६ (वार्ताहर) ः नवी मुंबईतून दुचाकीने पनवेलच्या दिशेने भरधाव वेगात जाणारा तरुण पुढे जाणाऱ्या वाहनावर दुचाकीसह धडकल्याने झालेल्या अपघातात या दुचाकीचालक तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी बेलापूर येथील उड्डाणपुलाजवळ बुधवारी (ता. ४) मध्यरात्री घडली. या अपघाताला मृत दुचाकीस्वार जबाबदार असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सुशील चंद्रकांत सोंडकर (३८) असे या मृत दुचाकीचालकाचे नाव असून तो पनवेलमधील उसर्ली गाव येथे राहत होता. बुधवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास सुशील आपल्या दुचाकीने नवी मुंबईतून पनवेल येथील आपल्या घरी जात होता. सुशील सीबीडी बेलापूर येथील उड्डाणपुलाजवळ भरधाव वेगात आला असताना, त्याला पुढे असलेल्या वाहनाचा अंदाज आला नाही. त्यामुळे सुशील पुढच्या वाहनावर दुचाकीसह धडकल्याने गंभीर जखमी झाला, त्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सीबीडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com