ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश साळगावकर यांचे निधन

ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश साळगावकर यांचे निधन
Published on

ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश साळगावकर यांचे निधन
मुंबई, ता. ६ : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश साळगावकर यांचे दीर्घ आजाराने शुक्रवारी सकाळी दादर येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी ४ वाजता दादर येथील शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी त्यांची काही मित्रमंडळी आणि नातेवाईक मंडळी उपस्थित होती. त्यांच्यामागे पत्नी असा परिवार आहे
१९८० आणि ९० च्या दशकात मराठी चित्रपटांना वेगळी ओळख देणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये साळगावकर यांचे नाव आदराने घेतले जात असे. त्यांनी आपल्या दिग्दर्शनातून अनेक लोकप्रिय चित्रपट प्रेक्षकांना दिले. मामला पोरींचा, सत्त्वपरीक्षा, दैवाचे खेळ, चार दिवस सासूचे आणि मधुचंद्राची रात्र यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. त्यांच्या चित्रपटांमध्ये कुटुंबकथा, सामाजिक आशय आणि मनोरंजनाचा समतोल पाहायला मिळत असे. त्यामुळे त्यांच्या चित्रपटांना त्या काळात प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्यांच्या निधनाने मराठी नाट्य व चित्रपट क्षेत्रातील एक अनुभवी दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड गेला असून, अनेक कलाकार आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com