१३.९१ कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा

१३.९१ कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा
Published on

१३.९१ कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा
अनधिकृत इमारतींची बेकायदा नोंदणी करून सरकारी तिजोरीवर डल्ला

नवी मुंबई, ता. ६ (वार्ताहर) : नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींमधील ९४१ दस्तांची बेकायदा नोंदणी करून शासनाचा तब्बल १३ कोटी ९१ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्यूटी) महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुर्भे पोलिसांनी याप्रकरणी कोपरखैरणे कार्यालयातील तत्कालीन प्रभारी सह दुय्यम निबंधकासह एजंट व इतरांवर सरकारी पदाचा गैरवापर करून शासनाची आणि जनतेची फसवणूक केल्याप्रकरणी बुधवारी (ता. ४) गुन्हा दाखल केला. महसूल विभागातील या मोठ्या घोटाळ्यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

कोपरखैरणे येथील सह दुय्यम निबंधक सहकारी संस्था सिडको कार्यालयात सप्टेंबर २०२४ ते जुलै २०२५ या कालावधीत प्रभारी सह दुय्यम निबंधक म्हणून राजकुमार दहिफळे हे कार्यरत होते. या कालावधीत दहिफळे यांनी दस्त नोंदणी एजंट योगेश चव्हाण आणि इतरांच्या मदतीने अनधिकृत इमारतींमधील बेकायदेशीर दस्तांची नोंदणी करून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केले. याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्याने ठाणे येथील जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या वतीने राजकुमार दहिफळे कार्यरत असताना झालेल्या दस्त नोंदणी कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत दहिफळे यांनी भारतीय नोंदणी अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन करून सिडको क्षेत्रातील अनधिकृत इमारतींमधील ९४१ दस्तांची बेकायदा नोंदणी करताना जाणूनबुजून कमी मुद्रांक शुल्क आकारल्याचे आढळून आले. या कृत्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाचे तब्बल १३ कोटी ९१ लाखांहून अधिक नुकसान झाल्याचे तपासात आढळून आले. दहिफळे यांनी दस्त नोंदणी एजंट योगेश चव्हाण आणि इतरांच्या मदतीने हा सर्व गैरव्यवहार केल्याचे आढळून आल्यानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने हा चौकशी अहवाल शासनाकडे पाठवला होता.

सह दुय्यम निबंधकांसह इतरांवर गुन्हा
शासनाने या प्रकरणातील दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर ठाणे येथील प्रभारी सह दुय्यम निबंधक ज्योती राऊत यांनी बुधवारी (ता. ५) तुर्भे पोलिस ठाण्यात या प्रकरणात रीतसर तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तत्कालीन प्रभारी सहदुय्यम निबंधक राजकुमार दहिफळे यांच्यासह एजंट योगेश चव्हाण व इतरांवर गुन्हा दाखल केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com