समृद्धी महामार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी ब्लॉक
समृद्धी महामार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी ब्लॉक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर बुलढाणा, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी गॅन्ट्री बसवण्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी रविवार (ता. ८) ते शुक्रवार (ता. २७) या कालावधीत वेगवेगळ्या दिवशी ब्लाॅक घेतला जाणार आहे. ब्लाॅकदरम्यान ४५ ते ६० मिनिटांकरिता संबंधित टप्प्यातील संपूर्ण वाहतूक बंद असणार आहे.
हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमअंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम केले जाणार आहे. हा ब्लाॅक बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, सिंदखेडराजा व देऊळगावराजा, जालना जिल्ह्यातील जालना तालुक्यातून आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, गंगापूर व वैजापूर तालुक्यातून जाणाऱ्या किमी २९६ ते किमी ५०२ दरम्यान असेल, असे एमएसआरडीसीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे वाहनधारकांनी त्याची दखल घेत आपल्या प्रवासाचे नियोजन करावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

