रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक: प्रवाशांचे होणार हाल !

रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक: प्रवाशांचे होणार हाल !

Published on

तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : उपनगरी रेल्वेमार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (ता. ८) रेल्वेच्या मध्य रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते  मुलुंड अप आणि डाऊन जलद  मार्गावर, तर कुर्ला ते वाशी  अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसा कोणताही मेगाब्लॉक नाही.
------------
मध्य रेल्वे -
कुठे- माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी- सकाळी ११.२० ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत
परिणाम-
सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या  मार्गावर वळवण्यात येतील. ठाण्याच्या पुढे या जलद लोकल डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल मुलुंड आणि माटुंगादरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. या लोकल गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.  
------------
हार्बर रेल्वे -
कुठे - कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर
कधी - सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत
परिणाम -
 सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूर/वाशीसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटीकरिता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल रद्द राहतील. ब्लॉक काळात सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी विभागांवर विशेष उपनगरी लोकल चालवल्या जातील. ब्लॉक काळात हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान  प्रवास करण्याची परवानगी आहे.
.............  
पश्चिम रेल्वे -
 कुठे - सांताक्रूझ ते माहीम  अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
कधी- मध्यरात्री १.०० ते पहाटे  ४.३० वाजेपर्यंत

परिणाम -
मुंबई सेंट्रल ते सांताक्रूझ स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल अप आणि डाऊन जलद मार्गावर चालवल्या जातील. यामुळे प्लॅटफॉर्मची लांबी कमी असल्याने लोकल लोअर परेल, माहीम आणि खार रोड स्थानकांवर दुहेरी थांबा देतील. प्लॅटफॉर्मच्या कमतरतेमुळे या लोकल महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड स्थानकांवर थांबणार नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com