उन्हाचा चटका वाढताच एसी, पंखे, कुलर सुसाट
उन्हाचा चटका वाढताच एसी, पंखे, कूलर सुसाट
विजेची मागणी ३० हजार मेगावॉटवर; मुंबईत ३,६०० मेगावॉटची नोंद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : मुंबईसह राज्यभरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून उन्हाचा चटका वाढल्याने नागरिक पुरते घामाघूम होऊ लागले आहे. या असह्य उकाड्यातून दिलासा मिळावा म्हणून नागरिकांनी एसी, पंखे, कूलरचा वेग वाढवल्याने विजेची मागणी ३० हजार मेगावाॅटच्या पुढे गेली आहे. त्यामुळे एप्रिल-मे महिन्यात विजेची मागणी विक्रमी टप्प्यावर पोहोचणार असल्याचे चित्र आहे.
राज्यात सुमारे चार कोटींच्या घरात वीजग्राहक असून, त्यांच्याकडून फेब्रुवारी अखेरपर्यंत २५-२७ हजार मेगावाॅटच्या घरात विजेची मागणी होती. मात्र, मार्च सुरू होताच तापमानाचा पारा वाढू लागल्याने विजेचा वापर वाढला आहे. आज मुंबईत ३,५०० मेगावाॅट एवढी विजेची मागणी नोंदली आहे, तर राज्यभरातून महावितरणकडे २६ हजार ७३१ मेगावाॅट एवढी मागणी होती. गेल्या तीन दिवसांत विजेच्या मागणीत झपाट्याने वाढ नोंदली आहे. मुंबईची आजची विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी टाटा पाॅवरने सुमारे ६७४ मेगावाॅट, अदाणीच्या डहाणू वीज केंद्रातून ३५० मेगावाॅट, पाॅवर एक्स्चेंजमधून २४७५ मेगावाॅट एवढी वीज घेतली आहे. दरम्यान, २१ मे २०२४ मध्ये ४,३०६ मेगावाॅट एवढी विक्रमी मागणी नोंदली होती. यंदा हा रेकाॅर्ड मोडणार का याकडे ऊर्जा क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
साडेआठ हजार मेगावाॅट वीज घेतली
- महावितरणची २६ हजार ७०० मेगावाॅट विजेची माणी पूर्ण करण्यासाठी महानिर्मितीच्या वीज केंद्रातून ८७१५ मेगावाॅट, खासगी वीज प्रकल्पातून ९३९६ मेगावाॅट, तर पाॅवर एक्स्चेंजमधून सुमारे साडेआठ हजार मेगावाॅट वीज घेतली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

