टाऊनहाॅन

टाऊनहाॅन

Published on

टाऊन हाॅल जिमखान्यावरून खडाजंगी
सुधारित प्रस्ताव द्या स्थायी समिती अध्यक्षांचे प्रशासनाला निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ ः मुंबई महापालिका मुख्यालयासमोर टाऊन हाॅल जिमखान्याचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. मात्र, टाऊन हाॅल जिमखान्यातील क्रीडा भवनचे १२ हजार सदस्य असून, त्यांना काय सुविधा देणार, याबाबत संपूर्ण सविस्तर प्रस्ताव सादर करा, अशी मागणी स्थायी समिती सदस्य अमय घोले यांनी आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत केली. घोले यांच्या मागणीला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याने या प्रस्तावार चांगलीच खडाजंगी झाली. अखेर सुधारित प्रस्ताव सादर करा, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी प्रशासनाला दिले.

पालिका मुख्यालयासमोर क्रीडा भवन असून, त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे क्रीडा भवनच्या जागी टाऊन हॉल जिमखाना बांधण्यात येणार आहे. आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. सुधारित प्रस्ताव सादर करत नेमकं काय असणार टाऊन हॉलमध्ये, याची माहिती स्थायी समितीत देण्यात यावी, अशी मागणी अमय घोले यांनी या वेळी केली. स्थायी समिती अध्यक्ष, विविध समित्यांचे अध्यक्ष यांच्यासाठी वाहन पार्क करण्यासाठी जागा उपलब्ध आहे, परंतु नगरसेवकांना जागा उपलब्ध होत नसल्याने टाऊन हॉलमध्ये नगरसेवकांची गाडी पार्क करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नगरसेविका सईदा खान यांनी या वेळी केली.

स्पष्ट माहिती द्या
या प्रस्तावावर सविस्तर चर्चा करूनच प्रस्ताव पुन्हा सादर करावा. विशेषतः या प्रकल्पामध्ये पार्किंगची व्यवस्था कशी असणार, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी कोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार, तसेच इतर आवश्यक सोयीसुविधा कशा असतील, याबाबत स्पष्ट माहिती देण्याची मागणी करण्यात आली. तसेच प्रकल्पातील विविध त्रुटी आणि तांत्रिक बाबींचा प्रशासनाने व्यवस्थित अभ्यास करून सुधारित प्रस्ताव पुन्हा स्थायी समितीसमोर आणावा, अशा सूचना सदस्यांनी दिल्या. त्यामुळे टाऊन हॉलचा प्रस्ताव नाॅट टेकन करत प्रशासनाने अधिक सविस्तर माहितीसह प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिले. सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com