केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत महाराष्ट्रातील साठाहून अधिक उमेदवार यशस्वी
राज्यातील ६० उमेदवार उत्तीर्ण
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर
मुंबई/नवी दिल्ली, ता. ६ ः केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा -२०२५ चा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या परीक्षेत एकूण ९५८ उमेदवार यशस्वी झाले असून, त्यात राज्यातील ६० हून अधिक उमदेवारांचा समावेश आहे. अनुज अग्निहोत्री हा देशात पहिला आला असून, पहिल्या १०० उमेदवारांमध्ये पाच जणांचा समावेश आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे नागरी सेवेची लेखी परीक्षा ऑगस्ट २०२५, तर मुलाखती डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान पार पडल्या होत्या. या दोन्ही टप्प्यांच्या आधारे आयोगाने एकूण ९५८ उमेदवारांची विविध केंद्रीय सेवांसाठी शिफारस केली आहे. यामध्ये सर्वसामान्य गटातून ३१७, आर्थिक मागासवर्ग प्रवर्गातून १०४, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून - ३०६, अनुसूचित जाती प्रवर्गातून - १५८, अनुसूचित जमाती प्रवर्गातून ७३ उमेदवारांचा समावेश आहे. लोकसेवा आयोगाने २५८ उमेदवारांची आरक्षित सूची जारी केली आहे. त्यात सामान्य गट - १२९, आर्थिक मागास प्रवर्ग - २६, इतर मागास वर्ग - ८६, अनुसूचित जाती - ८, अनुसूचित जमाती - ६, तर तीन दिव्यांगांचा समावेश आहे.
----
देशातील पहिले १० यशस्वी उमेदवार
१. अनुज अग्निहोत्री
२. राजेश्वरी सुवे एम
३. आकांश धुल्ल
४. राघव झुनझुनवाला
५. ईशान भटनागर
६. झिनिया अरोरा
७. ए. आर. रजाह मोहैदीन
८. पक्षाल सेक्रेटरी
९. आस्था जैन
१०. उज्ज्वल प्रियंक
----
महाराष्ट्रातील यशस्वी उमेदवार
हृषीकेश आलासे (६१) आकाश त्रिवेदी (७३) गौरव चोप्रा (८३) सायली पगार (८७), दीक्षा पाटकर (८८), ऋतुजा गायकवाड (१०६), वरुण टोकस (११७), अंकिता अनिल पाटील (१४०), आर्यन सिरसीकर (१७५), कार्तिक बच्छाव (१७७), राहुल पाटील (२२४), शुभम शरद बेहेरे (२२६), ऋषिकेश पालिमकर (२८३), मोहिनी जगताप (३२३), अभिषेक ओझार्डे (३३६), हर्षवर्धन पाटील (३४९), हर्षवर्धन तिडके (३५५), कुणाल अहिरराव (४३०), अभिषेक मगदूम (४४९), धनश्री अहिरे (४८९), मनोज पाटील (४९३), विशाखा कदम (५०४), नंदिनी पाटील (५१२), रजत वाळके (५१४), निखिल तांबे (५१७), श्रुती चव्हाण (५२७), धनंजय दिघे (५२९), संकेत कुंभार (५३९), साईराज पाटील (५४५), आरुषा पाटील (५५३), पारस मिस्त्री (५५५), बापूसाहेब गायकवाड (५६१), प्रवीण कोळपे (५८४), अविष्कार डेर्ले (५९१), रोहित माळवेकर (६०१), अभिषेक टेकाडे (६१०), सिद्धार्थ तागड (६१९), भाग्यश्री नायकेले (६४७), शिवम वखारे (६५१), पांडुरंग कांबळी (६६०), अश्विनी कोळेकर (६७५), प्रज्वल नासरे (६७७), अल्पेश ढवळे (६८७), सूरज सूर्यवंशी (७०२), रामेश्वर शिंदे (७०५), बसवराज पाटील (७३९), प्रीतकुमार भाले (७४२), राजश्री देशमुख (७५४), चेतन ठाकरे (७६२), प्रांजली मेश्राम (७६७), मनीष झेंडे (७८८), प्रथमेश शिंदे (८१७), राहुल चांडोलकर (८३१), हेमकृष्ण पिसाडे (८४९), अतुल राजुरकर (८६३), रोहित सांगळे (८६५), सुरेश बोरकर (९१२), प्रेरणा खवले (९१३), अनिकेत अहिरे (९४१).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

