‘एअरपोर्ट ३६० एक्स्पो’मध्ये होणार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सहभागी
‘एअरपोर्ट ३६० एक्स्पो’मध्ये होणार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सहभागी
मुंबई, ता. ६ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आगामी ‘एअरपोर्ट ३६० एक्स्पो २०२६’मध्ये सहभागी होणार आहे. भारताच्या वेगाने विकसित होत असलेल्या विमान वाहतूक परिसंस्थेला बळकट करण्यासाठी, मीडिया फ्युजनद्वारे आयोजित या एक्स्पोसाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लि.ला प्रीमियम एअरपोर्ट पार्टनर म्हणून घोषित करण्यात आले आहे. या भागीदारी करारावर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅप्टन बी. व्ही. जे. के. शर्मा आणि मीडिया फ्युजनचे व्यवस्थापकीय संचालक ताहेर पात्रावाला यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
‘एअरपोर्ट ३६० हा एक्स्पो’ २३ ते २४ एप्रिल २०२६ दरम्यान मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित केला जाईल. यामध्ये विमानतळ ऑपरेटर, नियोजक, तंत्रज्ञान पुरवठादार आणि धोरणकर्ते एकत्र येणार आहेत. हा कार्यक्रम टर्मिनल विकास, एअरसाइड ऑपरेशन्स, ग्राउंड हँडलिंग, मेंटेनन्स, रिपेअर आणि ओव्हरहॉल प्रवासी अनुभव आणि शाश्वतता यांसारख्या क्षेत्रांमधील उदयोन्मुख उपायांवर लक्ष केंद्रित करेल. या वेळी मीडिया फ्युजनचे व्यवस्थापकीय संचालक ताहेर पात्रावाला यांनी सांगितले, की भारताची विमान वाहतूक बाजारपेठ २०३० पर्यंत २६ अब्ज डॉलर्सच्या पलीकडे जाण्याची अपेक्षा आहे आणि वार्षिक प्रवासी संख्या सहा कोटींपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, अशा वेळी विमानतळ, कनेक्टिव्हिटी आणि ऑपरेशन्समध्ये एकात्मिक उपायांची गरज पूर्वीपेक्षा जास्त वाढली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ‘एअरपोर्ट ३६० एक्स्पो’मधील सहभाग संपूर्ण विमान वाहतूक परिसंस्थेमध्ये सहकार्याला चालना देणारे व्यासपीठ तयार करण्याच्या आमच्या ध्येयाला पुढे नेतो. ‘एअरपोर्ट ३६० एक्स्पो’ हा ‘इंटर पॅसेंजर टर्मिनल शो २०२५’च्या यशावर आधारित आहे, ज्याला २,२०० हून अधिक विमान वाहतूक व्यावसायिक, ६२ आंतरराष्ट्रीय प्रदर्शक आणि ५० हून अधिक उद्योगातील वक्त्यांचा प्रतिसाद मिळाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

