मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेसला चार अतिरिक्त डबे

मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेसला चार अतिरिक्त डबे

Published on

मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसला  चार अतिरिक्त डबे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद एसी सुपरफास्ट तेजस स्पेशल एक्स्प्रेसला अतिरिक्त  चार डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०९०२७/२८ मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद एसी सुपरफास्ट स्पेशलमध्ये एक डबा एसी दोन-टियर आणि तीन डबे  एसी तीन-टियर असे एकूण चार अतिरिक्त डबे जोडण्यात आले आहे. या बदलानुसार ७ मार्चला मुंबई सेंट्रलवरून सुटणारी गाडी क्रमांक ०९०२७ तसेच ९ मार्चला अहमदाबादवरून सुटणारी गाडी क्रमांक ०९०२८ आता १५ ऐवजी १९ डब्यांसह धावणार आहे. गाडीचे थांबे, वेळापत्रक आणि डब्यांची रचना याबाबतची सविस्तर माहिती प्रवाशांना रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com