

जेजेबीकडून अल्पवयीन मुलाला जामीन
सोमय्या महाविद्यालय येथील अपघाताचे प्रकरण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : मुंबईमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या अपघाती मृत्यूप्रकरणी शुक्रवारी (ता. ६) एका अल्पवयीन मुलाला बाल न्याय मंडळाने (जेजेबी) जामीन मंजूर केला. अल्पवयीन मुलाकडून गाडी चालविताना हा अपघात झाला होता.
दुसरीकडे, सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलाच्या व्यावसायिक वडिलांना दोन दिवसांपूर्वीच जामीन मंजूर केला होता. त्यानंतर शुक्रवारी मंडळाकडून अल्पवयीन मुलालाही जामीन मंजूर करण्यात आला; परंतु त्या आदेशाची सविस्तर प्रत उपलब्ध झालेली नाही. विद्याविहारमधील सोमय्या महाविद्यालयाजवळ ५ फेब्रुवारीला हा अपघात झाला. जेव्हा अल्पवयीन मुलगा गाडी चालवत असताना त्याने एका दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये धुर्मिल आणि मीनल पटेल हे दाम्पत्य जखमी झाले. त्यानंतर १० दिवसांनी धुर्मिलचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूनंतर पिता-पुत्रावर भारतीय न्याय संहिताच्या संबंधित तरतुदींनुसार बेदरकार गाडी चालवणे, सदोष खून आणि इतरांच्या जीवाला आणि सुरक्षिततेला धोका आणि मोटार वाहन कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, अल्पवयीन मुलाविरुद्ध बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तथापि, पीडितेचे कुटुंबीय या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.