भारत-न्यूझीलंड फायनलसाठी रेल्वेची ‘स्पेशल’ खेळी

भारत-न्यूझीलंड फायनलसाठी रेल्वेची ‘स्पेशल’ खेळी

Published on

भारत-न्यूझीलंड अंतिम सामन्यासाठी
मुंबई-पुण्यावरून दोन विशेष गाड्या
 सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अहमदाबाद येथे रविवारी होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी मुंबई, पुण्यातून जाणाऱ्या क्रिकेटप्रेमींच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने दोन विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ट्रेन क्रमांक ०११५३ एसी सुपरफास्ट विशेष गाडी शनिवारी (ता. ७) रात्री १०.०५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.४० वाजता अहमदाबादला पोहोचेल. परतीची ट्रेन क्रमांक ०११५४ एसी सुपरफास्ट विशेष गाडी सोमवारी (ता. ९) पहाटे ४ वाजता अहमदाबादहून सुटून दुपारी १२.५५ वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, वसई रोड, सुरत आणि वडोदरा येथे थांबे असतील. पुणे-अहमदाबाद मार्गावरही ०१४१७ सुपरफास्ट विशेष गाडी शनिवारी (ता. ७) सायंकाळी ५.३० वाजता पुण्याहून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वाजता अहमदाबादला पोहोचेल. परतीची ०१४१८ सुपरफास्ट विशेष गाडी सोमवारी (ता. ९) पहाटे २ वाजता अहमदाबादहून सुटून दुपारी १२.१० वाजता पुण्यात दाखल होईल. या गाडीला लोणावळा, कल्याण, वसई रोड, सुरत आणि वडोदरा येथे थांबे असतील. या विशेष गाड्यांचे आरक्षण ७ मार्चपासून भारतीय रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com