कोपरखैरणे घटनेतील जखमींच्या मदतीला शिवसेना धावली
कोपरखैरणे घटनेतील जखमींना शिवसेनेची मदत
मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना पाच लाख तर जखमी विद्यार्थ्यांचा खर्च देणार
वाशी, ता. ६ (बातमीदार) ः कोपरखैरणे सेक्टर दोन येथील विद्याभवन को-ऑप. हाउसिंग सोसायटीच्या इमारतीत घराचा स्लॅब कोसळल्याची घटना गुरुवारी (ता. ५) घडली. या घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर १२ विद्यार्थी जखमी झाले होते. जखमी विद्यार्थ्यांची नवी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. दरम्यान, विजय चौघुले यांनी जखमी विद्यार्थ्यांचा उपचाराचा संपूर्ण खर्च शिवसेनेकडून केला जाईल, अशी घोषणा केली.
कोपरखैरणे सेक्टर दोन येथील विद्याभवन अपार्टमेंटमध्ये खासगी शिकवणी सुरू असताना स्लॅब कोसळल्याची घटना घडली. याची माहिती पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के यांना दिली गेली. शिवसेनेने जखमी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा उपचाराचा खर्च उचलला आहे. घटनेत मृत्यू झालेल्या १३ वर्षीय मनीष म्हसे याच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत दिली आहे. या घटनेला कोण कारणीभूत आहे, याचा शोध प्रशासनाने घ्यावा. अशा घटना वारंवार होत असल्याने प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, असे विरोधी पक्षनेते चौगुले यांनी सांगितले. या वेळी जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, नागरसेवक शिवराम पाटील, माजी नगरसेवक विजयानंद माने, कोपरखैरणे विभागाचे सहाय्यक आयुक्त भरत धांडे आदी उपस्थित होते.
अनधिकृत बांधकामाची श्वेतपत्रिका काढा!
नवी मुंबईतील सत्ताधाऱ्यांनी नगरविकास खात्यामार्फत मागील पाच वर्षांत झालेल्या विकासकामांची श्वेतपत्रिका काढली आहे. पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी शहरातील अनधिकृत बांधकामांचीदेखील श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी महापौरांकडे करणार आहे. सत्ताधारी एकीकडे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलला विरोध करीत आहेत. अनेक हॉस्पिटल विकण्याचे प्रकार सुरू आहेत. या प्रकाराचीदेखील चौकशी झाली पाहिजे. केवळ टॅक्स वाढवणार नाही, अशी घोषणा करणाऱ्यांनी अनधिकृत बांधकामांची श्वेतपत्रिका काढून दाखवावी, अशी मागणीही विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

