संघर्षनगरात ५८ फूट भगवा ध्वज ठरला आकर्षण
संघर्षनगरात ५८ फूट भगवा ध्वज ठरला आकर्षण
घाटकोपर, ता. ८ (बातमीदार) : संघर्षनगर, चांदिवली येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने उभारण्यात आलेल्या भव्य शिवस्मारकासह १७ फूट उंच भारतमाता मूर्ती, १७ फूट प्रभू श्रीराम मूर्ती तसेच मुंबईतील सर्वात उंच ५८ फूट पवित्र भगवा ध्वजाचे लोकार्पण गुरुवारी (५) उत्साहात पार पडले. या सोहळ्यास हजारो नागरिकांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रम संजय उपाध्याय यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या वेळी श्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे मुंबई प्रमुख विनायकराव बाळगुडे, बजरंग दलाचे पदाधिकारी, विविध सामाजिक व धार्मिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच परिसरातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. या राष्ट्रभक्तीपर वास्तूचे काम आशीष शेलार यांच्या विशेष निधीतून पूर्ण झाले असून संजय उपाध्याय यांच्या सहकार्याने हा उपक्रम साकार झाला. संघर्षनगर परिसरात उभारण्यात आलेले हे स्मारक राष्ट्रभक्ती, इतिहासाची प्रेरणा आणि सामाजिक एकात्मतेचे प्रतीक ठरेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या उपक्रमासाठी शिवस्मारक समिती चांदिवलीचे संस्थापक अध्यक्ष महेश केदारी चौगुले व रेश्मा महेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम देशभक्तीपूर्ण वातावरणात पार पडला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

