पक्षविरोधी भूमिकेमुळे नगरसेवक मधुर म्हात्रे यांना शिवसेनेचा अंतिम इशारा

पक्षविरोधी भूमिकेमुळे नगरसेवक मधुर म्हात्रे यांना शिवसेनेचा अंतिम इशारा

Published on

ठाकरे गटाचा नगरसेवक मधुर म्हात्रेंना कारवाईचा इशारा
४८ तासांत स्पष्टीकरण देण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ७ : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील शिवसेना ठाकरे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक मधुर जनार्दन म्हात्रे यांना पक्षविरोधी भूमिकेबाबत अंतिम इशारा देण्यात आला आहे. पक्षाच्या अधिकृत गटात तत्काळ सहभागी होऊन ४८ तासांच्या आत लेखी स्पष्टीकरण सादर करा अन्यथा अपात्रतेची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या घडामोडीमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कल्याणच्या प्रभाग क्रमांक १३ मधून शिवसेना ठाकरे गटाच्या चिन्हावर मधुर म्हात्रे निवडून आले. निवडून आल्यानंतर मात्र त्यांनी महापालिकेतील पक्षाच्या अधिकृत गटात सहभागी होण्याऐवजी स्वतंत्र भूमिका घेतल्याचा आरोप पक्षाने केला आहे. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी वाढल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात शिवसेना गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख शरद शिवाजी पाटील यांनी म्हात्रे यांना अधिकृत पत्र पाठविले आहे. या पत्रात त्यांच्या सध्याच्या भूमिकेमुळे महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था सदस्य अपात्रता अधिनियम, १९८६ अंतर्गत अपात्रतेची कारवाई होऊ शकते, असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे तत्काळ पक्षाच्या अधिकृत गटात सहभागी होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तसेच निर्दिष्ट कालावधीत समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्यास कोकण विभागीय आयुक्तांकडे अपात्रतेची कारवाई सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येईल, असा इशाराही पत्रातून देण्यात आला आहे.
दरम्यान, निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर म्हात्रे हे तब्बल तीन आठवडे कथित देवदर्शनासाठी गैरहजर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता म्हात्रे पक्षाच्या नोटीसला काय उत्तर देतात तसेच पक्षात परत येतात की स्वतंत्र भूमिका कायम ठेवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com