चार सदस्यीय प्रभाग पद्धती रद्द करा
चार सदस्यीय प्रभाग पद्धती रद्द करा
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची सरकारकडे मागणी
भाईंदर, ता. ७ (बातमीदार) : चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये आरपीआयसारख्या छोट्या पक्षांचे सदस्य निवडून येणे कठीण असते; यासाठी नगरपालिका, पालिकांसाठी ही पद्धत रद्द करण्याची मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. मिरा रोड येथील कार्यकर्ता मेळाव्याला आठवले उपस्थित होते. या वेळी राज्यातील सत्तेत वाटा मिळत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
सर्व महापालिकांमध्ये सत्तेत भागीदारी मिळाली पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अथवा दोन महामंडळे व एक विधान परिषद सदस्यत्व देण्याचे आश्वासन दिले आहे. भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निवडणुकीसाठी महायुती झाली नाहीतर पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवतात. त्याच धर्तीवर युती झाली नाहीतर काही जागा लढण्याची तयारी करावी लागेल, असे आठवले यांनी या वेळी सांगितले.
-------------------------------------
राष्ट्रीय पक्षाच्या दिशेने वाटचाल
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यामुळे दहा वर्षे मंत्रिपद मिळाले. त्यामुळे पक्षाचा देशभर विस्तार करता आला. २८ राज्ये, आठ केंद्रशासित प्रदेशात आरपीआयच्या शाखा आहेत. नागालँडमध्ये पक्षाचे दोन आमदार आहेत. मणिपूरमध्ये लोकसभेला पक्षाला चांगली मते मिळाली. आगामी पाच राज्यांच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने पक्षाला चिन्ह दिले आहे. दोन राज्यात आरपीआयला सहा टक्के मते अथवा काही उमेदवार निवडून आले तर आरपीआयला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळेल, असा विश्वास रामदास आठवले यांनी या वेळी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

