‘जल महोत्सव’चा आज सोहळा
‘जल महोत्सव’चा आज सोहळा
ग्रामपंचायतस्तरावर २२ मार्चदरम्यान विविध उपक्रम
पालघर, ता. ७ (बातमीदार) : ग्रामीण पाणीपुरवठा व्यवस्था अधिक शाश्वत, सक्षम करण्यासोबतच पाणी व्यवस्थापनात ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ८ ते २२ मार्च कालावधीत ‘जल महोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमातातून ग्रामसभा व पाणी समित्यांच्या माध्यमातून पाणीसंवर्धन व पाणीपुरवठा व्यवस्थापनाशी संबंधित प्रत्यक्ष कृतींवर भर दिला जाणार आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जलजीवन मिशनअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत वैयक्तिक नळजोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यातील शाळा, अंगणवाड्या, अनुदानित आश्रमशाळा तसेच शासकीय वसतिगृहांना योजनेअंतर्गत नळजोडण्या उपलब्ध केल्या आहेत. याच अनुषंगाने जल महोत्सवाच्या निमित्ताने ग्रामपंचायत स्तरावर विविध उपक्रम केले जाणार आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांनी एकत्र येऊन जलस्रोतांचे जतन व संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी केले आहे.
----------------------------
उपक्रमाची वैशिष्ट्ये
गावांमध्ये ‘लोकजल उत्सव’ साजरा करून पाणी व्यवस्थापनाबाबत जनजागृती केली जाणार असून हा उपक्रम पूर्णपणे लोकसहभागावर आधारित असेल. याचबरोबर महिलांच्या सहभागातून फिल्ड टेस्टिंग किटच्या माध्यमातून जल गुणवत्तेची तपासणी, गावातील जलस्रोतांचे संरक्षण, पाणी बचतीचे महत्त्व, पाणी व्यवस्थापनातील नागरिकांच्या भूमिकेबाबत जागरूकता निर्माण केली जाणार आहे.
---------------------------
ग्रामीण पाणीपुरवठा व्यवस्था अधिक शाश्वत व मजबूत करण्यासाठी तसेच गावातील पाणीपुरवठा योजना सातत्याने कार्यरत राहण्यासाठी सामुदायिक सहभाग वाढविणे आवश्यक आहे. या उद्देशाने जिल्ह्यात ‘जल महोत्सव’ कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
- अतुल पारसकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

