वैतागवाडीतील समस्यांची प्रशासनाकडून दखल

वैतागवाडीतील समस्यांची प्रशासनाकडून दखल

Published on

वैतागवाडीतील समस्यांची प्रशासनाकडून दखल
विक्रमगड, ता. ७ (बातमीदार) ः विक्रमगड तालुक्यातील खुडेद ग्रामपंचायतीअंतर्गत वैतागवाडी येथील ग्रामस्थांनी मांडलेल्या विविध मागण्यांची दखल घेत प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे वैतागवाडी गावाची समस्यांतून सुटका होण्याची शक्यता आहे.
वैतागवाडीतील विकासकामे, ग्रामसभा साहित्य खरेदी, रोहयोअंतर्गत रखडलेली कामे सुरू करणे तसेच ग्रामपंचायत कार्यालयाकडील आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्याबाबत महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या होत्या. या मागण्यांचा विचार करून ग्रामपंचायतीने प्रशासकीय प्रक्रिया सुरू केल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच चर्चेसाठी आवश्यक असलेल्या साहित्य खरेदीची प्रक्रिया ३० मार्चपर्यंत पूर्ण करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय, वैतागवाडी ग्रामसभेत मंजूर रोहयो आराखड्यातील रखडलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com