पालिका रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात

पालिका रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात

Published on

पालिका रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात
कालबाह्य औषधांचा वापर, भाजपच्या गटनेत्याचा आरोप
नालासोपारा, ता. ७ (बातमीदार) ः वसई-विरार पालिकेच्या सर डी. एम. पेटिट रुग्णालयात कालबाह्य औषधे असल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे; पण रुग्णालय व्यवस्थापनाने हे आरोप फेटाळले असले तरी पालिकेचे रुग्णालय मात्र वादात सापडले आहे.
वसईच्या सर डी. एम. पेटिट रुग्णालयात कालबाह्य झालेली औषध दिली जात असल्याच्या तक्रारी भाजप गटनेते अशोक शेळके यांच्याकडे आल्या होत्या. त्यावरून शुक्रवारी दोन नगरसेवकांसह त्यांनी पाहणी केली होती. काही औषध कालबाह्य झाल्याचे आढळून आले. तर काही औषधांची मागणी ही सहा महिन्यांनंतर केल्याचे निष्पन्न झाल्याचा आरोप शेळके यांनी केला आहे.
दरम्यान, नगरसेवक अशोक शेळके यांनी केलेले आरोप रुग्णालय व्यवस्थापनाने फेटाळले आहेत. कालबाह्य झालेली औषधे वेगळे ठेवून नंतर त्यांची विल्हेवाट लावली जात असल्याची माहिती रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. राणी बदलानी यांनी केली आहे. तसेच या प्रकरणात आयुक्त, वरिष्ठांची चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com