शंकरराव चौकात बसविलेल्या मोबाईल टॉवरची चौकशी करण्याची भाजपाची मागणी
शंकरराव चौकातील मोबाईल टॉवरबाबत चौकशीची मागणी
भाजपचे महापौरांसह आयुक्तांना पत्र
कल्याण, ता. ७ ( वार्ताहर) : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ८ मधील शंकरराव चौक येथे एक मोबाईल नेटवर्क टॉवर बसवण्यात आला आहे. या टॉवरमुळे नागरिकांसह पशु, पक्षांमध्ये कर्करोगाचा धोका वाढला असून त्याबाबत भाजप कल्याण शहर सरचिटणीस प्रशांत माळी यांनी केडीएमसी महापौर आणि आयुक्तांना तक्रार करत त्या मोबाईल टॉवरबाबत चौकशीची मागणी केली आहे.
शंकर चौकातील हा टॉवर नुकताच बसवण्यात आला आहे. सदर टॉवर हा अतिशय गर्दीच्या व संवेदनशील ठिकाणी बसविण्यात आला असून त्याच्या अगदी शेजारी शाळा, मुख्य रस्ता तसेच महानगरपालिकेचे मुख्यालय आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, नागरिक व वाहनांची सतत ये-जा असते. त्यामुळे येथील अनेकांसाठी तो धोकादायक ठरत आहे. स्थानिकांच्या मते, या टॉवरमुळे लहान मुलांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. गर्दीच्या मुख्य रस्त्यालगत टॉवर असल्यामुळे भविष्यात अपघात किंवा इतर सुरक्षा धोके संभवतात. टॉवर बसविताना महानगरपालिकेची आवश्यक परवानगी, स्ट्रक्चरल स्थिरता प्रमाणपत्र, अग्निसुरक्षा ना हरकत प्रमाणपत्र तसेच दूरसंचार विभागाची परवानगी घेण्यात आली आहे की नाही याबाबत नागरिकामध्ये शंका निर्माण झाली आहे.
त्यामुळे हा टॉवर बसविण्यासाठी महानगरपालिकेची वैध परवानगी घेतली आहे का, स्ट्रक्चरल स्थिरता प्रमाणपत्र, अग्निसुरक्षा ना हरकत प्रमाणपत्र उपलब्ध आहे का, दूरसंचार विभागाच्या नियमांचे पालन करण्यात आले आहे का, हा टॉवर नागरिकांच्या व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण करीत असल्यास तो तात्काळ हटविण्यात यावा. ही बाब नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षेशी संबंधित अत्यंत गंभीर बाब असल्याने याची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी प्रशांत माळी यांनी प्रशासनाकडे केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

