आंबेडकरी  युवा मोर्चाच्या वतीने केडीएमसीच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

आंबेडकरी युवा मोर्चाच्या वतीने केडीएमसीच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Published on

रुक्मिणीबाई रुग्णालयात कालबाह्य एक्सरे मशीन वापरात
आंबेडकरी युवा मोर्चाचा आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्न

कल्याण, ता. ७ ( वार्ताहर) : रुक्मिणीबाई रुग्णालयात वापरात असलेली एक्सरे मशीनची वैधता २०२१ सालीच संपली असताना तिचा वापर करून रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप आंबेडकरी युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आला आहे. तसेच कल्याण येथील श्वास लसीकरण व निब्रीजिकरण केंद्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपदेखील यावेळी संघटनेचे मार्गदर्शक डॉ. प्रशांत इंगळे यांनी केला आहे. यावेळी अध्यक्ष विनोद भालेराव, प्रदीप सोनावणे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आंबेडकरी युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी खाजगी रुग्णालयाकडून सामान्य जनतेची लुट होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. या खाजगी रुग्णालयाने सेवापत्रकांचे दर दर्शनी भागात लावणे गरजेचे असल्याचे सांगत एखाद्या खाजगी रुग्णालयाकडून जर अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन होत असेल, तर त्यांची मान्यता रद्द करण्याची मागणी यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आली. तसेच महापालिका स्तरावर कोणत्याही प्रकारच्या समस्येसाठी एक टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात यावा, रुक्मिणीबाई व शास्त्रीनगर रुग्णालयात स्वस्त व जेनरीक औषधे उपलब्ध करून देण्यात यावीत अशी मागणीही त्यांच्यावतीने करण्यात आली.
यावेळी इंगळे म्हणाले की, श्वान लसीकरण व निर्बीजीकरण केंद्रात झालेल्या भ्रष्टाचारात सामान्य जनतेच्या टॅक्सच्या पैशांची उधळपट्टी करण्यात आली असून लवकरात लवकर जीवरक्षा ॲनिमल वेलफेअर संस्थेकडून या पैशांची वसुली करण्यात यावी. केंद्रात झालेल्या भ्रष्टाचाराशी संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच रुक्मिणीबाई रुग्णालयातील कालबाह्य झालेली एक्सरे मशीन तात्काळ बदलण्यात यावी ही आमची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com