वाहतूक कोंडीवर मुख्यालयात बैठक

वाहतूक कोंडीवर मुख्यालयात बैठक

Published on

वाहतूक कोंडीवर मुख्यालयात बैठक
विरार, ता. ७ (बातमीदार) ः वसई-विरार महापालिका हद्दीतील वाहतूक कोंडीच्या (ट्रॅफिक) नियोजनासंदर्भात मुख्यालयात महापौर अजीव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील मुख्य रस्त्यावर, रेल्वे स्थानकाजवळ, चौक तसेच विविध रहदारीच्या ठिकाणांवर होत असलेल्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करणे, नागरिकांना सुरक्षित व सुलभ प्रवास सुविधा उपलब्ध करून देणे, फेरीवाल्यांविषयी योग्य त्या उपाययोजना करणे, भविष्यातील वाहतूक गरजा लक्षात घेऊन प्रभावी उपाययोजना राबविण्याबाबत महापौरांनी उपस्थित शासकीय विभागांना सूचना दिल्या. तसेच सर्व विभागांनी समन्वयाने काम करून शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करावेत, असे निर्देशही दिले. या बैठकीत अडथळा निर्माण करणाऱ्या फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करणे, प्रमुख चौकांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, सिग्नल व्यवस्थेचे आधुनिकीकरण तसेच वाहतूक शिस्तीबाबत जनजागृती करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com