औद्योगिक क्षेत्रात धुराचे लोट

औद्योगिक क्षेत्रात धुराचे लोट

Published on

औद्योगिक क्षेत्रात धुराचे लोट
तारापूरमध्ये कचऱ्याची जाळपोळ; कामगारांसह जनावरांना धोका

बोईसर, ता. ७ (वार्ताहर) ः तारापूर औद्योगिक क्षेत्रातील मोकळ्या भूखंडावर कचरा पेटवण्याचे प्रकार वांरवार घडत आहेत. त्यामुळे कारखान्यांतील प्रदूषणाबरोबर कचऱ्यातून निघणाऱ्या धुराचा सामना परिसरातील कामगारांना करावा लागत आहे.
कचऱ्याच्या ढिगाऱ्यांना आग लावल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरतो. या धुरामुळे औद्योगिक वसाहतीत ये-जा करणारे हजारो कामगार त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, मोकळ्या भूखंडावर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक व इतर घातक साहित्य मिसळलेले असते. त्यामुळे पर्यावरण नियमांना पायदळी तुडवत जाणीवपूर्वक आगी लावण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकारामुळे कामगारांना श्वास घेण्यास त्रास होणे, डोळ्यांची जळजळ, घशात खवखव अशी लक्षणे दिसून येत असल्याची तक्रार येत आहेत. त्यामुळे संबंधित प्रशासन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने हस्तक्षेप करून कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी, तसेच कचऱ्याला आग लावण्याच्या प्रकारांना कायमचा आळा घालावा, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com