कल्याणात शिवजयंती निमित्त शिवसेनेच्यावतीने भव्य मिरवणूक

कल्याणात शिवजयंती निमित्त शिवसेनेच्यावतीने भव्य मिरवणूक

Published on

शिवजयंती निमित्त भव्य मिरवणूक

कल्याण, ता. ७ (वार्ताहर) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथी नुसार असलेली जयंती शुक्रवारी (ता. ६) राज्यात जल्लोषात साजरी झाली. यावेळी शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक कल्याणनगरीत जागोजागी महाराजांना मानवंदना देत, मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवसेना शहर शाखेच्या वतीने चलचित्र रथांसह भव्य मिरवणूक काढत शिवछत्रपतींना मानवंदना देण्यात आली.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील, नगरसेवक गणेश जाधव, जयवंत भोईर, किरण भांगले, प्रतिक पेणकर, माजी नगरसेवक सुनील वायले, अरविंद पोटे, प्रभुनाथ भोईर, नगरसेविका विजया पोटे, शालिनी वायले, डॉ. तनुजा वायले, शिवसेना पदाधिकारी देवानंद भोईर, प्रताप परदेशी आदींसह शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आदिवासींचे तारपा नृत्य, झांजांचा निनाद, ढोल ताशांचा गजर, शिवरायांनी रायरेश्वराच्या पिंडीवर हिंदवी स्वराज्याची घेतलेली शपथ असे आकर्षक चित्ररथ आणि लेझीम पथकाच्या दणदणीत सलामीत कल्याणात शिवजयंती उत्साहात साजरी झाली.
कल्याण शहरात चौकाचौकात शिवसेना शाखांतर्फे शिवरायांच्या पराक्रमाचे गोडवे गाणारे देखावे सजवण्यात आले होते. भगव्या कमानी, झेंडे आणि शिवाजी महाराजांची शौर्यगाथा यांचे वर्णन करणाऱ्या पोवाड्यांमुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. सकाळपासूनच भगवे फेटे बांधलेले आणि भगवे झेंडे डौलाने मिरवणारे मावळे शिवछत्रपतींना वंदन करत असल्याचे चित्र येथे पाहण्यास मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com