विठ्ठलवाडी एसटी आगारात शिवजयंतीचा उत्साह

विठ्ठलवाडी एसटी आगारात शिवजयंतीचा उत्साह

Published on

विठ्ठलवाडी एसटी आगारात शिवजयंतीचा उत्साहात
रस्ते सुरक्षा जनजागृती, आरोग्य शिबिर तून जनजागृती

​कल्याण, ता. ७ (बातमीदार) : अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार असलेल्या जयंतीचे औचित्य साधून, राज्य परिवहन महामंडळाच्या विठ्ठलवाडी एसटी आगारात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव समिती विठ्ठलवाडी व कल्याण आगार यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
​कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि मानवंदना देऊन करण्यात आली. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक महेश गायकवाड उपस्थित होते. त्यांच्यासोबत नवनिर्वाचित नगरसेवक किरण भांगले आणि दया शेट्टी यांनीही महाराजांना अभिवादन केले. केवळ उत्सवच नव्हे, तर आगाराच्या कार्यशाळेतील व्यवस्थापकीय कार्यालयातही छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
​​उपस्थित कर्मचाऱ्यांना संबोधित करताना महेश गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि कल्याण शहराचा ऐतिहासिक वारसा उलगडून सांगितला. विठ्ठलवाडी एसटी आगारात सण आणि उत्सव एकोप्याने साजरे करण्याची जुनी परंपरा आजही तितक्याच उत्साहात जपली जात आहे, ही कौतुकास्पद बाब आहे, असे या वेळी गायकवाड म्हणाले. ​याप्रसंगी विठ्ठलवाडी आगार व्यवस्थापक राहुल कुंभार, कल्याण आगार व्यवस्थापक सचिन भोये, स्थानक प्रमुख अविनाश गोसावी आणि उत्सव समिती सचिव योगेंद्र कदम यांच्यासह आगारातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
सामाजिक उपक्रमांचे आयोजन
​केवळ मिरवणूक किंवा भाषणे न ठेवता, यावर्षी सामाजिक भान जपत विविध उपक्रम राबवण्यात आले. प्रवाशांच्या आणि चालकांच्या सुरक्षेसाठी आगारात ‘रस्ते सुरक्षा’ या विषयावर प्रभावी पथनाट्य सादर करण्यात आले. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शेकडो कर्मचाऱ्यांनी ईसीजी, रक्तदाब, शुगर, ऑक्सिजन पातळी आणि नेत्रतपासणी करून घेतली. ​कार्यक्रमाच्या सांगताप्रसंगी सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. या उपक्रमामुळे विठ्ठलवाडी आगारात चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com