मराठ्यांच्या शौर्याला नव्याने उजाळा

मराठ्यांच्या शौर्याला नव्याने उजाळा

Published on

मराठ्यांच्या शौर्याला नव्याने उजाळा
जंजिरे धारावी किल्याचा विजयोत्सव जल्लोषात
भाईंदर, ता. ७ (बातमीदार): उत्तन जवळील चौक गावातील ऐतिहासिक जंजिरे धारावी किल्ल्याचा २८८ वा विजयदिन मोठ्या उत्साहात पार पडला. मिरा भाईंदर महापालिका, जंजिरे धारावी किल्ला जतन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा विजयदिन साजरा करण्यात आला.
चिमाजी अप्पा यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातून वसई किल्ला मुक्त केला. या विजयात भाईंदर जवळील जंजिरे धारावी किल्ल्याचे योगदान मोठे आहे. हा किल्ला मराठा साम्राज्यात आणण्यासाठी आठ वेळा युद्ध करण्यात आले होते. अखेर नवव्या वेळी, म्हणजे ६ मार्चला किल्ला जिंकण्यात मराठ्यांना यश आले. त्यामुळे हा दिवस किल्ल्याचा विजयदिन म्हणून साजरा केला जातो. वसई किल्ला जिंकण्यासाठी जंजिरे धारावी किल्ल्यातून पोर्तुगीजांची समुद्रमार्गे येणारी रसद तोडण्यात आली होती. विजयोत्सवाची सुरुवात महापौर डिंपल मेहता, उपमहापौर ध्रुव किशोर पाटील यांच्याहस्ते आई धारावी देवीची पूजा करून तसेच किल्ल्यात स्थापित करण्यात आलेल्या नरवीर चिमाजी अप्पा यांच्या अश्वारूढ मूर्तीला माल्यार्पण करून करण्यात आली. त्यानंतर किल्यातील समुद्रालगत असलेल्या बुरुजाजवळ पूजा सावंत यांच्या ''शिवगाथा'' कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. यावेळी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनीही यावेळी नृत्य, विविध कलांचे सादरीकरण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com