रेल्वेच्या मातीभरावाने नवे संकट
रेल्वेच्या मातीभरावाने नवे संकट
मिरा-भाईंदर जलमय होण्याची भीती, महापौरांकडून दखल
भाईंदर, ता.७ (बातमीदार): दहिसर ते मिरा रोड दरम्यान रेल्वेच्या अतिरिक्त रेल्वे मार्गासाठीच्या भरावामुळे पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या जाफरी खाडीचे पात्र अरुंद झाले आहे. त्यामुळे पावसाळ्यात पूर येण्याची भीती असल्याने महापौर डिंपल मेहता यांनी भराव हटवण्याचे आदेश दिले आहेत.
बोरिवली ते विरार दरम्यान पाचव्या, सहाव्या मार्गाचे काम सुरू आहे. त्यासाठी दहिसर ते मिरा रोड दरम्यान मोठ्या प्रमाणात माती भराव करण्यात आला आहे. मिरा रोड येथे जाफरी खाडी रेल्वे मार्गाला ओलांडून जाते. या ठिकाणी खाडीत भराव करण्यात आला असून पाणी वाहून जाण्यासाठी मोठे पाईप टाकण्यात आले आहेत. परंतु, पावसाळ्यात पावसाचे पाणी वाहून जाणे अशक्य असून जलभराव होण्याची शक्यता उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांनी व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर शहरातील नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण व्हावीत तसेच पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी महापौर डिंपल मेहता यांनी शुक्रवारी (ता.६) आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत पावसाच्या पाण्याचा निचरा योग्य रीतीने व्हावा यासाठी खाडीतील माती भराव हटविण्याचे आदेश रेल्वे अधिकाऱ्यांना दिले आहेत.
----------------------------------------
नालेसफाईच्या कामांवरून तंबी
मिरा भाईंदर महापालिका क्षेत्रात २०८ लहान मोठे नाले आहेत. या सर्व नाल्यांची सद्यस्थिती, नालेसफाईचे नियोजन, संभाव्य अडथळे, पावसाळ्यात पाणी साचण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांचा सविस्तर आढावा महापौरांनी यावेळी घेतला. शहरातील प्रमुख नाले, उपनाले तसेच जलनिस्सारण व्यवस्थेची स्थिती यावर सविस्तर चर्चा करून पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्या टाळण्यासाठी नालेसफाईची कामे नियोजनबद्ध व वेळेत पूर्ण करण्याबाबत तसेच रेल्वे मार्गालगत असलेल्या नाल्यांची स्वच्छता, कांदळवन परिसरातील जलनिस्सारण व्यवस्थेबाबत निर्देश दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

