पाणीटंचाईच्या संकटाची चाहूल
पाणीटंचाईच्या संकटाची चाहूल
जव्हारमधील २५ टक्के कुपनलिका नादुरुस्त
जव्हार, ता. ७ (बातमीदार)ः तालुक्यात पाणी अडविणे बाबत धोरणात्मक उपाययोजना नसल्याने जानेवारीतच पाणी टंचाईला सुरुवात होते. या पाणी टंचाईला पर्याय तालुक्यात १९४ कुपनलिका आहेत. मात्र, २५ टक्के कुपनलिका नादुरुस्त असल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
मार्चच्या सुरवातीपासूनच उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने जव्हार तालुक्यात पाणीटंचाईची समस्या तीव्र होते. तालुक्यात काही भागात सार्वजनिक कुपनलिका नादुरुस्त आहेत. पंचायत समितीकडे दुरुस्तीसाठी चार कर्मचारी उपलब्ध आहेत. मात्र, भौगोलिक दृष्ट्या जव्हार, मोखाडा हा परिसर खूप मोठा असल्याने दुरुस्तीत अडथळा निर्माण होत आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे, उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पाण्याची पातळी झपाट्याने खाली जात आहे. काही ठिकाणी पाणी उपलब्ध होऊ शकते, तर काही ठिकाणी तांत्रिक बिघाडामुळे पाणी उपसा बंद आहे. मात्र, दुरुस्तीअभावी अनेक गावांमध्ये सुविधा असून ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.
--------------------
तालुक्यात उपलब्ध असलेले कुपनलिरका दुरुस्तीसाठी वर्षभराकरिता ३ हजार रुपये वर्गणी घेतली जाते. ही वर्गणी ग्रामपंचायत, पंचायत समिती तथा जिल्हा परिषदोच्या माध्यमातून भरण्यात येते. काही ठिकाणी सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून पाण्याची व्यवस्था केली गेली आहे.
- विनायक खिरारी, कुपनलिका विभाग
-----------------------------
जव्हार तालुक्यात पाणी टंचाईला सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने तालुक्यातील कुपनलिका दुरुस्तीबाबत जव्हार पंचायत समितीचे गट विकास अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. जेणेकरून पाण्यासाठी नागरिकांची होणारी वणवण थांबेल.
- एकनाथ दरोडा, सरपंच, झाप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

