महिला उद्योजिकेच्या कर्तृत्वाची छाप
महिला उद्योजिकेच्या कर्तृत्वाची छाप
ओंदे गावातील वैशाली सांबरे यांचा प्रेरणादायी प्रवास
विक्रमगड, ता. ८ (बातमीदार) ः आजच्या काळात स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कर्तृत्व सिद्ध करत आहेत. ओंदे गावातील वैशाली सांबरे यांनीदेखील प्रगतशील शेतकरी ते यशस्वी उद्योजिका असा प्रवास करत स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले आहे.
ओंदे गावात सात ते आठ एकर शेती आहे. पाच-सहा वर्षांपूर्वी त्यांनी शेतात विविध नगदी उत्पन्न देणारी भाजीपाला पिके तसेच रब्बी हंगामातील पिकांची लागवड करून चांगले उत्पन्न मिळवले. शेतीसोबतच पडीक जमिनीचा योग्य वापर करत आंब्याची ६०, काजूची २०, नारळाची २८ झाडे तसेच इतर विविध फळझाडांची लागवड करून पडीक जमिनीत सुंदर फळबाग फुलवली आहे. याच काळात गावातील महिलांना एकत्र करून त्यांनी ‘गृहलक्ष्मी बचत गट’ स्थापन करत घरगुती उद्योगाची सुरुवात केली. पापड, कुरडया, शासकीय कार्यालये, शासकीय कार्यक्रम, शिबिरातून व्यवसाय सुरू केला.
चिकाटी, कष्ट करण्याची तयारी, विनम्रता असेल तर महिल यशस्वी उद्योजिका बनू शकतात, असे वैशाली सांबरे सांगतात. त्यांच्या याच कार्याची दखल घेत जिजाऊ सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांना कुणबी समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
---------------------------------------
अल्पदरात वसतिगहाची सुविधा
झडपोली येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहाची सोय नसल्यामुळे विद्यार्थ्यांना राहण्याची मोठी अडचण भासत होती. ही गरज ओळखून वैशाली सांबरे यांनी २०१६ला खासगी विद्यार्थ्यांचे वसतिगृह सुरू केले. या वसतिगृहात धुळे, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना अल्पदरात राहणे, जेवणाची सोय उपलब्ध करून दिली आहे.
--------------------------
महिलांनी स्वतःची क्षमता, कौशल्य आणि उद्योग करण्याची तयारी ठेवली तर निश्चितच यशस्वी उद्योजिका बनू शकतात. यासाठी कुटुंबाचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असते.
- वैशाली सांबरे, महिला उद्योजिका, विक्रमगड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

