महिला सक्षमीकरणाचा संकल्प - आयुक्त मनिषा आव्हाळे

महिला सक्षमीकरणाचा संकल्प - आयुक्त मनिषा आव्हाळे

Published on

महिला आरोग्य आणि सुरक्षिततेवर भर ः आयुक्त मनिषा आव्हाळे
उल्हासनगर, ता. ७ (वार्ताहर) : उल्हासनगर महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच महिला आयुक्त म्हणून जबाबदारी स्वीकारलेल्या मनिषा आव्हाळे यांनी महिला दिनानिमित्त प्रेरणादायी संदेश देत आरोग्य, सक्षमीकरण आणि सामाजिक सहभागाला प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. एका महिला अधिकारी म्हणून शहराच्या प्रशासनाची धुरा सांभाळण्याचा सन्मान हा अभिमानासोबतच मोठी जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
महिला दिनानिमित्ताने बोलताना मनिषा आव्हाळे म्हणाल्या की, उल्हासनगरसारख्या गतिमान शहराची जबाबदारी सांभाळताना महिलांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि स्वावलंबनासाठी विशेष उपक्रम राबवणे हे प्रशासनाचे प्राधान्य राहील. एक महिला म्हणून या पदावर काम करताना शहरातील प्रत्येक महिलेला सुरक्षित, सक्षम आणि संधीसमान वातावरण मिळावे यासाठी प्रयत्न करणे ही माझी जबाबदारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
महिला दिन हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून महिलांच्या आरोग्य, सन्मान आणि सक्षमीकरणासाठी सामूहिक बांधिलकी व्यक्त करण्याचा दिवस असल्याचे सांगत आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी शहरातील महिलांनी या उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

विविध जनजागृतीपर कार्यक्रम
यंदाचा आंतरराष्ट्रीय महिला दिन उल्हासनगर पालिकेच्या वतीने विविध जनजागृतीपर कार्यक्रमांद्वारे साजरा करण्यात येणार आहे. विशेषतः मुलींना गर्भाशयमुख कर्करोगापासून संरक्षण देण्यासाठी एचपीव्ही लसीकरणाबाबत जनजागृती व सुरक्षिततेचा दृढ संकल्प करण्यात येणार आहे. यासोबतच महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर, कौशल्यविकास व प्रशिक्षण कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम तसेच रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले आहे. यावेळी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून प्रावीण्य मिळवलेल्या महिलांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरवही करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com