वॉशिंग मशीनला आग

वॉशिंग मशीनला आग

Published on

वॉशिंग मशीनला आग; फ्रिजसह वायरिंग जळून नुकसान
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : वृंदावन सोसायटी परिसरातील एका घरातील वॉशिंग मशीनला अचानक आग लागून फ्रिज आणि घरातील इलेक्ट्रॉनिक वायरिंग जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी (ता. ६) सायंकाळी घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.
वृंदावन सोसायटीतील बिल्डिंग क्रमांक ७३, ए-२ विंग या तळ + ४ मजली इमारतीमधील तळमजल्यावरील रूम क्रमांक ०२ येथे ही आग लागली. ही खोली अशोक सेमला यांच्या मालकीची असल्याची माहिती समोर आली आहे. घरातील वॉशिंग मशीनमध्ये बिघाड झाल्याने अचानक आग लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या आगीत वॉशिंग मशीनसह फ्रिज आणि घरातील इलेक्ट्रिक वायरिंगचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिका अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मात्र, त्यापूर्वीच स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली.
दरम्यान, घटनेच्या वेळी एक रेस्क्यू वाहन पाचारण करण्यात आले होते, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com