पनवेल पालिकेतर्फे ‘पनवेल नारी सन्मान २०२६’ कार्यक्रम

पनवेल पालिकेतर्फे ‘पनवेल नारी सन्मान २०२६’ कार्यक्रम

Published on

पनवेल पालिकेतर्फे ‘पनवेल नारी सन्मान २०२६’ कार्यक्रम
पनवेल, ता. ७ (बातमीदार) : जागतिक महिला दिनानिमित्त पनवेल महानगरपालिकेच्या वतीने ‘पनवेल नारी सन्मान – २०२६’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सोमवार, ता. ९ मार्च रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ७ या वेळेत आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमहापौर प्रमिला रविनाथ पाटील उपस्थित राहणार आहेत. तसेच खासदार श्रीरंग बारणे, विधान परिषद सदस्य विक्रांत पाटील आणि आमदार प्रशांत ठाकूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११.३० वाजता दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन आणि मान्यवरांच्या स्वागताने होणार आहे.
हा कार्यक्रम दोन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आला असून पहिल्या सत्रात पनवेल शहरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा तसेच मान्यवर नगरसेवकांचा सन्मान करण्यात येणार आहे. याशिवाय संगणकीय गुन्हे, महिला सुरक्षा, स्त्री भ्रूणहत्या प्रतिबंध तसेच महिलांशी संबंधित कायद्यांतील तरतुदींविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
दुपारच्या सत्रात महिलांसाठी ‘जागर स्त्री शक्तीचा’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यानंतर महानगरपालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. तसेच महिलांसाठी विविध खेळ, पैठणीचा खेळ आणि भाग्यशाली सोडतीचेही आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६.३० ते ७ या वेळेत पारितोषिक वितरणाने कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.
महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रेरणा देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. महापौर नितीन पाटील तसेच आयुक्त मंगेश चितळे यांनी शहरातील नागरिकांनी आणि महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com