

टिटवाळ्यातील फळविक्रेत्या महिलेचा गौरव
महिलादिनी टिटवाळ्यातील कष्टकरी सलमाचा सन्मान
टिटवाळा, ता. ७ (वार्ताहर) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून टिटवाळ्यात स्त्रीशक्ती, शिवभक्ती आणि सामाजिक ऐक्याचा एक अनोखा संगम पाहायला मिळाला. धर्माच्या चौकटीपलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांप्रति अपार श्रद्धा जपणाऱ्या सलमा या कष्टकरी फळविक्रेत्या महिलेचा विविध सामाजिक संस्थांतर्फे सन्मान करण्यात आला.
रोजच्या कष्टाची आणि धावपळीची सुरुवात करण्यापूर्वी सलमा या छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करूनच कामाला लागतात. एका साध्या फळविक्रेत्या महिलेची ही निष्ठा आणि जिद्द पाहून संपूर्ण परिसरात त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात येते. ही बातमी समजताच टिटवाळ्यातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत सलमा यांच्या श्रद्धेचा गौरव केला. राजे ग्रुप आणि संभाजी ब्रिगेडकडून सलमा यांना सन्मानित करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ घोषणांमध्ये किंवा पुतळ्यांपुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या न्यायनिष्ठा, सर्वसमावेशकता आणि स्वाभिमानाच्या विचारांना प्रत्यक्ष आचरणात उतरवणे हीच खरी आदरांजली आहे. सलमा यांच्या कृतीतून शिवरायांच्या विचारांचा सार्वत्रिक संदेश अधोरेखित होतो. धर्म, जात किंवा पंथ यापेक्षा माणुसकी आणि स्वराज्याचा विचार अधिक मोठा आहे, असे मान्यवरांनी सांगितले.
‘राजमाता जिजाऊ’ पुरस्कार
राजे ग्रुपचे सामाजिक कार्यकर्ते महेश ऐगडे, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अॅड. जितेंद्र जोशी यांनी सलमा यांचा साडी-चोळी देऊन गौरव केला. तसेच संभाजी ब्रिगेडचे प्रभाकर भोईर यांच्याकडून ‘राजमाता जिजाऊ’ पुरस्कार प्रदान करून त्यांच्या श्रद्धेचा सन्मान करण्यात आला. अॅड. जितेंद्र जोशी यांनी त्या दिवशी त्यांच्या फळांची खरेदी करून कष्टाला मान देत सन्मानाला अधिक अर्थपूर्ण स्वरूप दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.