वांद्री परिसरात पाणीटंचाईची झळ

वांद्री परिसरात पाणीटंचाईची झळ

Published on

वांद्री परिसरात पाणीटंचाईची झळ
वसई-विरार पालिकेच्या जलवाहिनीची दुरुस्ती लांबली
मनोर, ता. ७ (बातमीदार) ः वसई-विरार पालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीची दुरुस्ती लांबली असून, धरणातून सिंचनासाठी पाणी सोडले नसल्याने विहिरी, बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे वांद्री धरण परिसरातील गावांना आठवडाभरापासून पाणीटंचाईची झळ बसत आहे. महापालिकेच्या जलवाहिनीची दुरुस्ती सुरू असून, यंदाच्या हंगामात वांद्री धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आल्याने भूजल पातळी खालावल्याने विहिरी, बोअरवेलसह पाण्याचे स्रोत कोरडे पडले आहेत. वांद्री धरण परिसरातील गावांमधील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी धावपळ सुरू आहे.
आठवडा भरापासून पाणीपुरवठा ठप्प झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या शोधात गृहिणींना पायपीट करावी लागत आहे. पाणी गळती रोखण्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून सुरू असलेले दुरुस्तीचे काम लांबले आहे. अशातच वांद्री धरणाच्या मुख्य कालव्यांमधून होणारी पाणी गळती रोखण्यासाठी कालव्यांवर दुरुस्तीची कामे प्रस्तावित असल्यामुळे धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे भूजल पातळी खालावली आहे.
--------------------------------------------
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
वसई तालुक्यातील कोपर गावाच्या हद्दीत वसई-विरार महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाणी गळती रोखण्यासाठी सुरू असलेले दुरुस्तीचे काम भरती-ओहोटी नुसार करावे लागत असल्यामुळे दुरुस्ती कालावधी वाढला आहे. आठ दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प झाल्यामुळे वापरासाठीसुद्धा पाणी मिळणे कठीण झाले आहे. या समस्येकडे लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांच्या दुर्लक्षामुळे नाराजीचे वातावरण आहे.
-----------------------------
भूजल पातळी खालावली
- वांद्री धरणाच्या पायथ्याशी असलेल्या गांजे गावातील विहिरींनी तळ गाठला आहे. वांद्री धारणातून सिंचनासाठी पाणी सोडले नसल्याने विहिरी कोरड्या पडल्या आहेत. भूजल पातळी खालावल्याने बहुतेक बोरवेल कोरड्या पडल्याने पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे.
- धरण परिसरातील गावांमध्ये भूजल पातळी राखण्यासाठी वांद्री धरणातून पाणी सोडण्याबाबत नियोजन सुरू असल्याची माहिती मिळवण्यासाठी पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता नीलकमल गवई यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com